OTT Released August 2024 : ऑगस्टमध्ये OTT वर होणार वेबसीरिज आणि चित्रपटांचा धमाका, आत्तात करा वॉचलिस्टमध्ये सेव्ह...

OTT Released August 2024 : OTT हे मनोरंजनाचं मोठं साधन आहे. चित्रपट, वेबसीरीजची मेजवानी इथे प्रेक्षकांना मिळते. आता ऑगस्टमध्ये ओटीटीवर असाच वेबसीरिज आणि चित्रपटांचा धमाका होणार आहे.
OTT Released August 2024 : ऑगस्टमध्ये OTT वर होणार वेबसीरिज आणि चित्रपटांचा धमाका, आत्तात करा वॉचलिस्टमध्ये सेव्ह...
List of OTT Released August 2024Saam Tv
Published on

Vaishnavi Raut, Saam Tv Mumbai

OTT हे मनोरंजनाचं मोठं साधन बनलेलं आहे. चित्रपट, वेबसिरीजमध्ये मेजवानी इथे प्रेक्षकांना मिळत असते. मराठी, हिंदी, इंग्रजी, ॲनिमेशन फिल्म्स ते डब्ड फिल्म्स (Dubbed Films)... अशा अनेक ऑप्शन OTT वर उपलब्ध असतात. आता ऑगस्टमध्ये OTT वर असाच वेबसीरिज आणि चित्रपटांचा धमाका होणार आहे. जणूकाही मनोरंजनाचा मेळाच लागल्याचं तुम्हाला भासू शकतं. नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, हॉटस्टार, सोनी लिव्ह, झी फाईव्ह अशा OTT प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही त्यांचा आनंद घेऊ शकणार आहात.

Phir Aayi Hasseen Dillruba Released OTT
Phir Aayi Hasseen Dillruba PosterSaam Tv

फिर आयी हसीन दिलरुबा- Phir Aayi Hasseen Dillruba

9 August- Netflix

विक्रांत मॅसी, तापसी पन्नू आणि सनी कौशल यांचा 'फिर आयी हसीन दिलरुबा' हे या यादीतील टॉपचं नाव. हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला म्हणजेच ९ ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सवर तुम्ही तो पाहू शकता. २०२१ मध्ये रिलीज झालेल्या 'हसीन दिलरुबा' या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.

Kill Movie Released OTT
Kill PosterSaam Tv

किल- Kill

Disney+ Hotstar

लक्ष्य, राघव जुयाल आणि तान्या माणिकतला यांचा 'किल' हा चित्रपट ऑगस्ट महिन्याच्या मधल्या आठवड्यांमध्ये OTTवर रिलीज होण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत 'किल'ने बॉक्स ऑफिसवर 21.15 कोटींची कमाई केली आहे. निखिल नागेश भट्ट दिग्दर्शित हा चित्रपट ऑगस्टच्या मध्यात Disney+ Hotstar वर प्रदर्शित केला जाईल.

Gyaarah Gyaarah Released OTT
Gyaarah Gyaarah Movie PosterSaam Tv

ग्यारह ग्यारह Gyaarah Gyaarah

9 August- Zee 5

राघव जुयाल 'ग्यारह गयाह' ही नवी वेबसीरिज घेऊन येत आहेत. 'किल'च्या निर्मात्यांसोबत ही वेबसीरिज तयार करण्यात आली आहे. या वेबसिरीजमध्ये राघवसोबत कृतिका कामरा आणि धैर्य करवा देखील आहेत. ही वेब सिरीज 9 ऑगस्ट 2024 रोजी Zee5 वर रिलीज होईल.

Ghudchadi Movie Released OTT
Ghudchadi PosterSaam Tv

घुडचढी Ghudchadi

9 August- Jio Cinema

संजय दत्त आणि रवीना टंडन अशी सुपरहिट जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे. 'घुडचढी' या चित्रपटातून 9 ऑगस्ट रोजी दोघेही त्यांच्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे. जिओ सिनेमावर हा चित्रपट प्रीमियर होणार आहे. रवीना आणि संजय व्यतिरिक्त, या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात खुशाली कुमार, पार्थ समथान आणि अरुणा इराणी आहेत.

Life Hill Gayi Released OTT
Life Hill Gayi PosterSaam Tv

लाइफ हिल गई Life Hill Gayi

9th August- Disney+ Hotstar

दिव्येंदू शर्मा आणि कुशा कपिला अशी धमाकेदार जोडी 'लाइफ हिल गई' या वेबसिरीजमधून दिसणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर ही कॉमेडी वेबसीरिज 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. या सिरीजमध्ये दिव्येंदू आणि कुशा व्यतिरिक्त विनय पाठक आणि भाग्यश्री देखील दिसणार आहेत.

Manorathangal Released OTT
Manorathangal MovieSaam Tv

मनोरथंगल Manorathangal

15 August- Zee 5

'मनोरथंगल' ही एक अँथॉलॉजी सीरिज असून ZEE5 वर 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. यात 9 कथा दाखवल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या सिरीजचं दिग्दर्शन 8 चित्रपट निर्मात्यांनी केलं आहे. आणि यात मोठमोठ्या कलाकारांनी काम केलं आहे. कमल हसन, मामूट्टी, मोहनलाल आणि फहद फासिलसह अनेक मोठे सुपरस्टार या वेबसीरिजमध्ये दिसणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com