Dattu More Anniversary Gift Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dattu More Anniversary Gift : हास्यजत्रा फेम दत्तूला लग्नाच्या वाढदिवशी बायकोकडून मिळालं हटके गिफ्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, 'ॲनिव्हर्सरी गिफ्ट...'

Dattu More News : २३ मे २०२३ रोजी दत्तूने स्वाती घुणगे हिच्यासोबत गुपचूप लग्नगाठ बांधली. नुकताच या कपलचा लग्नाचा पहिला वाढदिवस झाला. लग्नाच्या वाढदिवशी दत्तूला त्याच्या बायकोने हटके गिफ्ट दिले आहे.

Chetan Bodke

'महाराष्ट्र हास्यजत्रा' या टेलिव्हिजन शोमुळे अनेक कलाकारांच्या प्रसिद्धीत वाढ झालेली आहे. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे दत्तू मोरे. दत्तूने आपल्या कॉमेडीच्या जोरावर मोठा चाहतावर्ग कमावला आहे. त्याचा चाहतावर्गही सोशल मीडियावर फार मोठ्या प्रमाणावर आहे.

गेल्या वर्षी दत्तूने स्वाती घुणगे हिच्यासोबत गुपचूप लग्न करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. नुकतंच या कपलचा लग्नाचा पहिला वाढदिवस झाला. लग्नाच्या वाढदिवशी दत्तू मोरेला त्याच्या बायकोने त्याची ड्रीम बाईक गिफ्ट केलेली आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना ही गुड न्यूज दिलेली आहे.

दत्तूने गेल्या वर्षी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याची सुरूवात केली. अभिनेत्याला पहिल्या लग्नाच्या वाढदिवशी त्याच्या पत्नीने महागडी ड्रीम बाईक गिफ्ट केलेली आहे. दत्तूने या दरम्यानचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे. "फायनली ड्रीम बाईक घेतली... ॲनिव्हर्सरी गिफ्ट... थँक्यू सो मच बायको..." असं कॅप्शन देत त्याने व्हिडीओ शेअर केलेला आहे. दत्तूला त्याच्या बायकोने बजाज कंपनीची ॲव्हेंजर कार ड्रीम बाईक गिफ्ट केलेली आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, या बाईकची किंमत १ लाखांच्या आसपास आहे. दत्तूला अनेक चाहत्यांसह सेलिब्रिटी मित्रांनी कमेंट केलेली आहे.

नेहमीप्रमाणे दत्तूचे चाहते कौतुकही करत आहेत, त्यासोबतच त्याला ट्रोलही केले आहे. निखिल बने, वनिता खरातसह अनेक सेलिब्रिटींनी दत्तूचे अभिनंदन केले आहे. त्यासोबतच एका युजरने अभिनेत्याला ट्रोलही केलं आहे. 'भाऊ राग नका येऊ देउ पण तुमचे पाय पुरतात का त्या गाडीवरून... अभिनंदन...' अशी त्याला त्या युजरने ट्रोल केले आहे. दत्तू आणि स्वातीने गेल्या वर्षी २३ मे रोजी गुपचूप लग्न केले. अभिनेत्याने साध्या सिंपल अंदाजात लग्नगाठ बांधली होती. कोर्ट मॅरेज करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'रिसॉर्ट पॉलिटिक्स'चा थरार! AIADMK ला फोडाफोडीची धास्ती, आमदारांना राज्याच्या बाहेर नेलं; तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ

Maharashtra News Live Update: घरकुल कामासाठी ३ हजारांची लाच घेताना सावरगावचा ग्रामरोजगार सेवक (acb)च्या जाळ्यात

Railway Rules: आता धावत्या ट्रेनमध्ये चढलात तर ₹२०००चा दंड; रेल्वे नवा कायदा करण्याच्या तयारीत

NESCO Drug Case : गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणाचं युरोप कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

Trisha Krishnan : साऊथ सुंदरी त्रिशाची राजकारणात एन्ट्री; थलपथी विजय यांच्या जागेवर पोटनिवडणूक लढणार?

SCROLL FOR NEXT