Maharashtrachi Hasya Saam Tv
मनोरंजन बातम्या

Maharashtrachi Hasyajatra: एक नंबर, तुझी कंबर...; 'शेकी शेकी' गाण्यावर शिरकली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची टीम, VIDEO व्हायरल

Maharashtrachi Hasyajatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा सोनी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या सेटवर जन्माष्टमीचा उत्सव दिमाखात पार पडला.

Shruti Vilas Kadam

Maharashtrachi Hasya: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा सोनी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम केवळ विनोदासाठीच ओळखला जात नाही, तर त्याच्या कलाकारांनीही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. अलीकडेच या कार्यक्रमाच्या सेटवर जन्माष्टमीचा उत्सव दिमाखात पार पडला. दहीहंडीचा माहोल, सजवलेला सेट, रंगीबेरंगी लाईट्स आणि आनंदी वातावरण यामुळे शूटिंगचा दिवस अगदी उत्साहात पार पडला. या विशेष निमित्ताने कार्यक्रमातील सर्व कलाकारांनी एकत्र येऊन धमाल डान्स केला करत आनंद साजरा केला.

यावेळी अभिनेत्री नम्रता संभेराव, शिवाली परब आणि निखिल बने शेकी शेकी या गाण्यावर थिरकले हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या गाण्यातील हूक स्टेप आपल्या खास अंदाजात सादर करून नम्रता संभेरावने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्यासोबत शिवाली परब, निखिल बने आणि चेतना भट यांनी देखील या गाण्यावर नाचताना दिसले. केवळ हेच नाही तर दत्तू मोरे, अरुण कदम, प्रसाद खांडेकर आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांनी देखील या डान्समध्ये सहभाग घेतला.

या गाण्याचं गायन संजू राठोड यांनी केलं असून संगीतकार G-Spark यांनी त्याला आकर्षक ठेका दिला आहे. “गुलाबी साडी”, “नऊवारी साडी” आणि “काली बिंदी” यांसारख्या त्यांच्या आधीच्या हिट गाण्यांनंतर “शेकी” हे गाणंही प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. सोशल मीडियावर या गाण्याच्या बीट्स आणि स्टेप्सना तरुणाईकडून विशेष प्रतिसाद मिळतो आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो केवळ महाराष्ट्रातच नाही तर परदेशात राहणाऱ्या मराठी प्रेक्षकांमध्येही तितकाच लोकप्रिय आहे. दर सोमवार आणि मंगळवारी रात्री ९ वाजता प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमातील कलाकारांचा विनोद, त्यांची टायमिंग, आणि अशा खास सण-उत्सवांतील मस्तीमुळे हा शो नेहमीच चर्चेत राहतो. जन्माष्टमीच्या या खास भागात प्रेक्षकांना केवळ हशाच नव्हे, तर नृत्य, गाणं आणि सणाचा उत्साही आनंदही अनुभवायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मालेगावात मटण-चिकन शॉप बंद, पालिकेच्या आदेशाचं कडेकोट पालन, VIDEO

Maharashtra Live Update: जळगाव राष्ट्रीय महामार्गावर पावसाच्या पाण्याचा झाला ओढा

Shocking : धक्कादायक! ड्रेनेज लाइनमध्ये उतरलेल्या ३ कामगारांचा मृत्यू, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

Pune Traffic: पुण्यातील वाहतूक कोंडी सुटणार! पालिका तयार करणार ३० मिसिंग लिंक; कुठून- कुठपर्यंत, कसा आहे प्लान?

Palasdari Tourism : पावसात खुलणार पळसदरीचे सौंदर्य; हे Top 7 धबधबे नक्की पहा

SCROLL FOR NEXT