Gulkand Song Video SAAM TV
मनोरंजन बातम्या

Gulkand Song Video : हास्यजत्रेच्या कलाकारांचा स्वॅग लय भारी! थेट न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरजवळ 'प्रेमाचा गुलकंद' गाण्यावर थिरकले

Sameer Chougule Post : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातील कलाकारांनी 'प्रेमाचा गुलकंद' गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. याचा व्हिडीओ समीर चौघुलेने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र 'गुलकंद' (Gulkand) चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटातील गाण्यांनी तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. प्रेमाची ही आगळी वेगळी गोष्ट पाहण्यासाठी चाहते खूपच आतुर आहेत. 'गुलकंद' चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटाला भरपूर पसंती मिळत आहे.

नुकताच समीर चौघुलेने (Samir Choughule) सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील कलाकार ‘प्रेमाचा गुलकंद’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळत आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील कलाकारांनी ‘प्रेमाचा गुलकंद’ गाण्यावर डान्स न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरजवळ (New York Times Square) केला आहे. या खास व्हिडीओ समीर चौघुलेने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

समीरच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून प्रेमाचा, कौतुकाचा आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या व्हिडीओला त्यांने हटके कॅप्शन देखील लिहिलं आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, "प्रेमाचं गुलकंद with MHJ फॅमिली at Times Square...आता 1 मे ला गुलकंद बघायला सहकुटुंब यायचं आणि खळखळून हसायचं..."

‘गुलकंद’ हा सिनेमा 1 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तगडे कलाकार पाहायला मिळत आहे. यात प्रसाद ओक, सई ताम्हणकर, समीर चौगुले, ईशा डे, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, आणि शार्विल आगटे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ‘गुलकंद’ कॉमेडी चित्रपट आहे. नात्यांमधली गुंतागुंत, भावना यांचा सुरेख मेळ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 'गुलकंद' चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन गोस्वामी यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

SCROLL FOR NEXT