Parth Bhalerao Shared Gaurav More Airport Incident Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gaurav More Interview: ‘फिल्टर पाड्याच्या बच्चन’ला का अडवलं लंडनच्या विमानतळावर?; एका चुकीमुळे झाली होती अभिनेत्याची कसून चौकशी

Gaurav More News: एका मुलाखतीमध्ये पार्थ भालेरावने चाहत्यांना गौरव मोरेचा शुटिंग दरम्यानचा परदेशातील एक किस्सा सांगितला.

Chetan Bodke

Parth Bhalerao Shared Gaurav More Airport Incident

फिल्टर पाड्याच्या बच्चनचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. आधी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि आता ‘बॉईज ४’च्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. “गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा” त्याच्या ह्या जबरदस्त डायलॉगमधून आणि हटक्या विनोदी शैलीतून गौरव मोरेने चाहत्यांच्या मनात घर निर्माण केले आहे.

सध्या ‘बॉईज ४’च्या प्रमोशनमध्ये टीम व्यग्र असून नुकतीच त्याने एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. मुलाखतीमध्ये पार्थ भालेरावने चाहत्यांना शुटिंग दरम्यानचा परदेशातील किस्सा सांगितला.

विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज ४’च्या माध्यमातून खूप मोठी आपल्याला पाहायला मिळणार आहे. चित्रपटामध्ये गौरव मोरे सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची शुटिंग फक्त भारतातच नाही तर, परदेशात सुद्धा झाली आहे. सध्या सोशल मीडियावर गौरव मोरेचा विमानतळावरील एक किस्सा प्रचंड चर्चेत आला आहे. ‘मीडिया टॉक’ या मराठी एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनलसोबत बोलताना पार्थ भालेरावने मुलाखतीत परदेशातील किस्सा सांगितला.

पार्थने मुलाखतीत सांगितले, “आम्ही सर्व मुंबईवरून गौरव युकेमध्ये शुटिंगसाठी येत होते. तेव्हा गौरवला युकेमध्ये विमानतळावर इमिग्रेशनच्या दरम्यान, तिथल्या काही अधिकाऱ्यांनी, ‘तुम्ही इथे का आलाय? इथे येण्याचा तुमचा उद्देश काय आहे?’ तर गौरवने ‘शूटिंग’ असं त्या अधिकाऱ्यांना उत्तर दिलं. त्याचं हे उत्तर ऐकून तेथील अधिकाऱ्यांनी त्याला अडवलं. गौरवच्या या घटनेनंतर संपूर्ण चित्रपटाच्या टीमला, चित्रपटाचं शूटिंग किंवा फिल्मोग्राफी सांगा, फक्त शूटिंग सांगू नका.” असं यावेळी पार्थने सांगितलं.

‘बॉईज’, ‘बॉईज २’ आणि ‘बॉईज ३’ च्या भरघोस यशानंतर प्रेक्षकांच्या भेटीला ‘बॉईज ४’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रॉडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘बॉईज ४’ची धमाल यावेळी चारपटीने वाढल्याचे दिसत आहे.

सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांच्यासोबत चित्रपटामध्ये ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे या दमदार कलाकारांची स्टारकास्ट चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. विशाल सखाराम देवरुखकर दिग्दर्शित आणि हृषिकेश कोळी लिखित चित्रपटाची निर्मिती लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT