Shivali Parab Reel Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shivali Parab Reel : 'प्यार किया तो निभाना' कल्याणची चुलबुली शिवली पडली प्रेमात? व्हिडीओ होतोय व्हायरल

Shivali Parab Post: कायमच आपल्या कॉमडीमुळे चर्चेत राहणारी शिवाली सध्या एका रिलमुळे चर्चेत आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shivali Parab : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या सोनी मराठीच्या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेल्या अभिनेत्री शिवाली परबचा फार मोठा चाहतावर्ग आहे. हास्यजत्रेमधून शिवालीला ‘कल्याणची चुलबुली’ या नावाने ओळख मिळाली आहे. कायमच आपल्या कॉमडीमुळे चर्चेत राहणारी शिवाली सध्या एका रिलमुळे चर्चेत आली आहे. अवघ्या काही तासांपूर्वीच शिवालीने एक सुंदर अशी रील सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या रिलमध्ये आलेल्या कमेंट्समुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे.

शिवलीने काही तासांपूर्वी अजय देवगण आणि सोनाली बेंद्रे यांच्या मेजर साब या चित्रपटातील प्यार किया तो निभाना या गाण्यावर रील सोशल मिडीयावर पोस्ट केली असून त्याखाली प्यार किया तो निभाना अशी कमेंट केली आहे. या रीलवर चाहते भरभरून कमेंट करत आहेत. कमेंटमध्ये स्टिकर्स आणि ईमोजीच्या माध्यमातून तिच्यावरील प्रेम व्यक्त करत आहेत. या रीलमध्ये प्यार किया तो निभाना या गाण्यावर एक्सप्रेशन देत आहे. तिला पासून ती नक्कीच तिच्या मनातील भावना सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

शिवलीने या रीलमध्ये फ्लॉरल प्रिंटेड कुर्ता घातला आहे. तर कानात झुमके घातले आहेत. तसेच तिने काळ्यारंगाची टिकली लावून हलका मेकअप केला आहे. शिवली या रीलमध्ये सुंदर दिसत असून तिला अनेक जरूर निभाएंगे अशा प्रतिक्रिया येत आहेत.

शिवाली परबच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून शिवाली परब प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. शिवालीने ‘चंद्रमुखी’ चित्रपटामध्ये छोट्या चंद्राचे पात्र साकारले होते. त्यानंतर तिचा पाणीपुरी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता लवकरच शिवली थेट तुमच्या घरातून आणि मंगला या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

आमदार गायकवाडांच्या गुंडगिरीला पुन्हा ऊत, पानसरेंच्या पुस्तकावरून गायकवाडांची 'बॉक्सिंग'

SCROLL FOR NEXT