Bhooth Bangla : अक्षय घेऊन येतोय 'भूत बंगला'; राजस्थानमध्ये शूटिंग सुरू, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Bhooth Bangla Movie : अक्षय कुमार आणि प्रियदर्शन या सुपरहिट जोडीने राजस्थानमधील भूत बंगल्याच्या पुढील शेड्यूलचे शूटिंग सुरू केले आहे. गेल्या महिन्यात मुंबईत शूटिंग सुरू केल्यानंतर टीम आता पुढील शेड्यूलच्या शूटिंग रवाना झाली आहे.
akshay kumar new film
Akshay kumarcanva
Published On

Bhooth Bangla : बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार लवकरच त्याच्या जुन्या अंदाजात दिसणार आहे. अक्षय आणि प्रियदर्शनची अप्रतिम जोडी पुन्हा एकदा धमाल करायला सज्ज झाली आहे. हे दोघेही भूत बांगला या हॉरर कॉमेडी चित्रपटातून एकत्र येत आहेत. प्रेक्षक आधीच या चित्रपटाबद्दल आणि अक्षय-प्रियदर्शनच्या कॉम्बोबद्दल खूप उत्सुक आहेत. आता बातम्या येत आहेत की या चित्रपटाचे शूटिंग देखील सुरू झाले आहे.

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. गेल्या महिन्यात मुंबईत शूटिंग सुरू केल्यानंतर, टीम आता पिंक सिटीमध्ये या हॉरर-कॉमेडीच्या पुढील शेड्यूलचे शूटिंग करत आहे. अक्षय आणि प्रियदर्शन यांनी भागम भाग आणि गरम मसाला सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. हॉरर-कॉमेडीबद्दल बोलायचे झाले तर, दोघांनीही कल्ट क्लासिक चित्रपट भूल भुलैया एकत्र केला होता. या जोडीला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

akshay kumar new film
Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma: अबब्..घटस्फोट झाला तर चहलला द्यावी लागेल धनश्रीला इतकी पोटगी! वाचा सविस्तर

आपल्या जबरदस्त कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जाणारा अक्षय कुमार या चित्रपटात आपल्या खास शैलीची जादू पसरवणार आहे. त्याचबरोबर प्रियदर्शनच्या दिग्दर्शनामुळे या चित्रपटाला एक नवा आणि मनोरंजक टच मिळणार आहे. जयपूर शेड्यूलमध्ये शहरातील प्रसिद्ध ठिकाणी अनेक आऊटडोअर शूटचा समावेश आहे, ज्यामुळे चित्रपटाला एक सुंदर वातावरणही मिळेल. विशेष म्हणजे, भूल भुलैयाच्या पहिल्या भागाचे बरेच शूटिंग जयपूरजवळील चोमू पॅलेसमध्ये झाले आहे

akshay kumar new film
Hania Aamir : चिकनी चमेलीवर पाकिस्तानी अभिनेत्रीचा भन्नाट डान्स, व्हिडीओ Viral

या चित्रपटाचा निर्माता कोण आहे?

हा चित्रपट शोभा कपूर, एकता कपूर आणि अक्षय कुमारच्या प्रॉडक्शन हाऊस 'केप ऑफ गुड फिल्म्स'च्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. बालाजी टेलिफिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर, फरा शेख आणि वेदांत बाली हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आकाश ए कौशिक यांनी लिहिली आहे, तर पटकथा रोहन शंकर, अभिलाश नायर आणि प्रियदर्शन यांनी तयार केली आहे. या चित्रपटाचे संवाद रोहन शंकर यांनी लिहिले आहेत. भूत बांगला 2 एप्रिल 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com