Ankush Chaudhari Dream Role Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankush Chaudhari Dream Role: अंकुशला साकारायची आहे ‘या’ दिग्दर्शकाची भूमिका; इच्छा व्यक्त करत म्हणाला...

अंकुशने मुलाखतीत त्याच्या ड्रिम रोलबद्दल सांगितले आहे.

Chetan Bodke

Ankush Chaudhari Interview: केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाची सध्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. अंकुश चौधरीने या चित्रपटात शाहीर साबळेंची भूमिका साकारली असून सध्या सर्वत्र चित्रपटाची चर्चा होत आहे. अभिनेता अंकुश चौधरी सध्या आपल्या सिनेकारकिर्दीतील पहिल्या वहिल्या बायोपिकमुळे कमालीचा चर्चेत आला आहे. अंकुशचा चित्रपटातील अभिनय आणि लूक पाहता सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

अंकुशला आपण आतापर्यंत अनेक चित्रपटांमधून, नाटक आणि मालिकेच्या माध्यमातून भेटलो आहोत. नेहमीच आपल्या अभिनयातून सर्वच पात्रांना योग्य तो न्याय देण्याचा तो प्रयत्न करतो. दुनियादारीतला दिघ्या असो किंवा दगडी चाळीतला सूर्या असूद्या. या भूमिका प्रेक्षकांच्या मनात त्याचे अढळ स्थान निर्माण करून गेले.

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच एका महान व्यक्तीच्या बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका साकारली. नुकताच अंकुशने ‘सकाळ डिजिटल’ सोबत संवाद साधताना अंकुशला, “नुकताच तू एक बायोपिक केला. असा कोणता रोल आहे का त्याची भूमिका तुला साकारायची आहे किंवा एखादा बायोपिक करावासा वाटतोय का?” असा प्रश्न विचारला होता. (Marathi Film)

यावेळी अंकुश म्हणतो, “खरं सांगायचं तर, मी कोणत्याही बायोपिक मध्ये शोभून दिसत नाही असं मला वाटतं. शोभून दिसण्यापेक्षा चेहराच कोणत्या फ्रेममध्ये माझा बसत नाही. मला नेहमीच सुबोध भावेच कौतुक वाटतं. त्याच्या खांद्यावर कोणतीही गोष्ट दिली तरी, तो ती अगदी लिलया पार पाडतो. दिलेल्या व्यक्तिरेखेत तो एकरूप होतो. बालगंधर्व असो किंवा टिळक असो सर्व भूमिकेत तो शोभून दिसत होता. या सर्व व्यक्तिरेखा त्याने अगदी सुंदर पद्धतीने पार पाडल्या आहेत.” (Marathi Actors)

पुढे अंकुश म्हणतो, “मला एकही व्यक्तिरेखा अशी वाटत नाही, की मी ते साकारू शकेल. पण शाहीर साबळेंची भूमिका लिलया पार पाडल्यानंतर लोक एकदा तरी विचार करतील की मी अशा पद्धतींचे कॅरेक्टर प्ले करू शकतो. माझं एक ड्रीम आहे की, जर भविष्यात कधी, व्ही शांताराम यांच्यावर फिल्म झाली तर मला नक्की त्यामध्ये काम करायला आवडेल.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025: महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरच नाही तर देशातील ७ प्रसिद्ध ठिकाणीही श्राद्ध, पिंडदान करतात

Pune Rain : पुण्यात मुसळधार पावसाचा कहर, रस्ते जलमय; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर, VIDEO

Donald Trump: अपघातातून थोडक्यात बचावले डोनाल्ड ट्रम्प; हवेतच होणार होती दोन विमानांची धडक

Maharashtra Live News Update: पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

Tanushree Dutta: 'फार्महाऊसवर न येता, तू हिरोईन...'; तनुश्री दत्ताने बॉलिवूडवर पुन्हा केले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT