Alyad Palyad New Poster Out Instagram
मनोरंजन बातम्या

Alyad Palyad Poster: 'रात्र वैऱ्याची अन्...'; गौरव मोरे लवकरच दिसणार नव्या भूमिकेत, पोस्टरने वेधलं लक्ष

Gaurav More New Film: कायमच आपल्या कॉमेडीमुळे चर्चेत राहणारा गौरव सध्या आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. नुकतंच गौरवने त्याच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Chetan Bodke

Alyad Palyad New Poster Out

फिल्टर पाड्याच्या बच्चनचा अर्थात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. कॉमेडी शो आणि चित्रपटाच्या माध्यमातून गौरव चाहत्यांच्या भेटीला येत असतो. सध्या गौरव हास्यजत्रेतून जरीही प्रेक्षकांच्या भेटीला येत नसला तरीही “गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा” त्याच्या ह्या डायलॉगची चर्चा होते. कायमच आपल्या कॉमेडीमुळे चर्चेत राहणारा गौरव सध्या आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. नुकतंच गौरवने त्याच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Marathi Actors)

नुकतंच गौरव मोरेने त्याच्या पर्सनल इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. 'अल्याड पल्याड' असे आगामी चित्रपटाचे नाव आहे. एस. एम.पी प्रोडक्शन् अंतर्गत ‘अल्याड पल्याड' चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली आहे. प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या पोस्टरने आणि उत्कंठावर्धक टिझरने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, अनुष्का पिंपुटकर आदी अनुभवी कलाकारांसोबत भाग्यम जैन हा नवा चेहरा या चित्रपटात दिसणार आहे. (Marathi Film)

"रात्र वैऱ्याची, अन् दार उघडं सताड, जीवावर बेतलं की घडतंय अल्याड पल्याड...!" असे कॅप्शन देत अभिनेत्याने पोस्ट शेअर केली आहे. आपला महाराष्ट्र हा समृद्धतेने आणि विविधतेने नटलेला आहे. त्यात अनेक जुन्या संस्कृती तसेच प्रथा परंपरा आहेत. अशाच एका वेगळ्या परंपरेची आराधना करण्याची प्रथा असणाऱ्या एका गावाची, तिथल्या माणसांची कथा सांगणारा ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट आहे. चित्रपटाची कथा प्रीतम एस के पाटील यांची असून पटकथा संवाद संजय नवगिरे यांचे आहेत. गौरव मोरेवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. (Social Media)

गौरव मोरेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, गौरव मोरेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ खांद्याला दुखापत झाल्यामुळे त्याला डॉक्टरांनी काही दिवसांसाठी आराम करायला सांगितला आहे. गौरव मोरेला हास्यजत्रेतून फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. त्याला हास्यजत्रेतून 'फिल्टर पाड्याचा बच्चन' म्हणून ओळख मिळाली आहे. गौरव हास्यजत्रेव्यतिरिक्त इतर प्रोजेक्ट्स मधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गौरव मोरे गेल्यावर्षी 'अंकुश', 'बॉइज ४', 'सलमान सोसायटी', 'लंडन मिसळ' या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर लवकरच प्रसाद ओकची प्रमुख भूमिका असलेल्या 'महापरिनिर्वाण' चित्रपटातही गौरव मोरे दिसणार आहे.. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Protest: मोठी बातमी! सरकारच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार, छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा सुरू

Actress : ...मारा, तिचे कपडे काढा, अफेयरच्या अफवांवरुन छळ, मराठी अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

Manoj jarange patil protest Live: - सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी नेते न्यायालयात धाव घेणार

Gunratan Sadavarte: मोठी बातमी! सरकारच्या निर्णयावर आक्षेप, गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाणार

Manoj Jarange: रक्ताने रंगवलेलं पिंपळपान: मनोज जरांगे आणि छत्रपती शिवाजी महाराज एकाच चित्रात|VIDEO

SCROLL FOR NEXT