Maharashtra Epstein Files: राज्यात गाजलेल्या एका चर्चित असलेल्या अशोक खरात प्रकरणावर आधारित 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून, चित्रपटाच्या विषयामुळे राजकीय वर्तुळासह मनोरंजन क्षेत्रातही उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण आणि त्यानंतर निर्माण झालेल्या वादांच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याने या टीझरला अधिक चांगला प्रतिसाद मिळत आहे.
चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद प्रमुख भूमिकेत दिसणार असून, टीझरमध्ये काही पात्रे आणि प्रसंग वास्तविक घटनांशी जोडलेली असल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, दिपाली सय्यद यांनी साकारलेलं पात्र त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. मात्र, चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याच्या उद्देशाने नसून सामाजिक वास्तवावर भाष्य करणारा असल्याचे स्पष्ट केले आहे.
टीझरमध्ये अंधश्रद्धा, सत्तेचा गैरवापर, महिलांचे शोषण आणि राजकीय संबंध अशा अनेक संवेदनशील मुद्द्यांना स्पर्श करण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता समाजासमोर काही गंभीर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दिसून येते. राज्यात गाजलेल्या कथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे यापूर्वीही मोठे राजकीय वाद निर्माण झाले होते. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले होते आणि अनेक राजकीय संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स'चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी चित्रपटाच्या धाडसी विषयाचे कौतुक केले, तर काहींनी संवेदनशील प्रकरणावर चित्रपट बनवण्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातून नेमके काय मांडले जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.