CM Shinde In Maharashtra Bhushan Award Ceremony Saam Tv
मनोरंजन बातम्या

Maharashtra Bhushan Award: अशोक सराफ हे मराठी मातीतला अस्सल हिरा: मुख्यमंत्री शिंदे

CM Shinde In Maharashtra Bhushan Award Ceremony: अशोक सराफ वयाचा अमृत महोत्सव म्हणजे पंच्याहत्तरी साजरी करत असताना महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना देण्यात येतोय. अवघ्या महाराष्ट्रासाठी हा केवळ अभिमानाचाच नाही तर अमृताहूनही गोड क्षण असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(गिरीश कांबळे, मुंबई)

57th Maharashtra State Film Awards Ceremony Cm Shinde :

सलग ५० वर्षे असंख्य भूमिका करुनही ज्यांच्यात अभिनयाची आणि नवं काही तरी करून दाखविण्याची भूक अजूनही अशोक सराफ यांच्यात कायम आहे. ते मराठी मातीतील अस्सल हिरे आहेत. अशोक सराफ यांचा मराठी मातीला, मराठी माणसाला सार्थ अभिमान असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.(Latest News)

आज महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. गेल्यावर्षी आशा भोसले आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) दिले ते सुद्धा आम्हाला भाग्य मिळालं. खरं म्हणजे गेल्या ३ वर्षाचा बॅकलॉग सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी भरुन काढला. राहिलेले पुरस्कार देण्यासाठी आम्हाला सरकार स्थापन करावे लागले. उरलेली काम करण्यासाठी हे सरकार स्थापन झाले असल्याचंही मुख्यमंत्री (Chief Minister) यावेळी म्हणाले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे

सर्व गौरवमूर्तींचे मनापासून अभिनंदन. अष्टपैलू, ऑल राऊंडर हा शब्द ज्याला खऱ्या अर्थाने ज्यांना लागू होतो ते नाव म्हणजे अशोक सराफ. सलग ५० वर्षे असंख्य भूमिका करुनही ज्यांच्यात अभिनयाची आणि नवं काही तरी करून दाखविण्याची भूक अजूनही त्यांच्यात आहे, ते मराठी मातीतील खरे हिरे आहेत.

अशोक सराफ वयाचा अमृत महोत्सव म्हणजे पंच्याहत्तरी साजरी करत असताना महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना देण्यात येतोय. अवघ्या महाराष्ट्रासाठी हा केवळ अभिमानाचाच नाही तर अमृताहूनही गोड क्षण आहे. गेल्या वर्षी ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले आणि ज्येष्ठ निरुपणकार तिर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो.

अशोक सराफ यांचे आडनाव जरी सराफ असले तरी त्यांची काही दागिण्यांची पेढी नव्हती मात्र त्यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी रसिकांवर सोने, चांदी, हिरे, मोत्यांची अक्षरशः उधळण केल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

सप्तशृंगी गडावरून परतताना भीषण अपघात; दुचाकीला प्रवासी वाहनाची जोरदार धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT