Maharaj Film Controversy  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Maharaj Film Boycott : आमिर खानच्या मुलाचा चित्रपट वादात अडकला; जुनैदच्या चित्रपटाला हिंदू संघटनांचा विरोध

Maharaj Film Controversy : अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान 'महाराज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. पण त्याचा पहिलाच चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान 'महाराज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. १४ जून रोजी 'नेटफ्लिक्स' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या टीमने कोणतंही प्रमोशन न करता आणि ट्रेलर रिलीज न करताच चित्रपट रिलीज करत आहेत. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाला बॉयकॉटचा सामना करावा लागत आहे.

आमिर खान शाहरुख खानपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना बॉयकॉट ट्रेंडचा सामना करावा लागला आहे. अशातच आता आमिर खानच्या ही पहिल्याच चित्रपटाला बॉयकॉट ट्रेंडचा सामना करावा लागत आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करण्याआधीच जुनैदला सोशल मीडियावर बॉयकॉट ट्रेंडला सामोरे जावे लागत आहे. ओटीटीवर रिलीज होणारा त्याचा 'महाराज' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

काही हिंदू संघटनांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. बजरंग दलाने 'महाराज'च्या रिलीजला विरोध करत मुंबईच्या दिंडोशी कोर्टात याचिका दाखल केली आहे. पीपिंगमूनच्या वृत्तानुसार, चित्रपटात साधूंची नकारात्मक प्रतिमा दाखवण्यात आल्याचे सांगत बजरंग दलाने आक्षेप व्यक्त केला आहे. त्यांनी निर्मात्यांना चित्रपटाची रिलीज थांबण्याची विनंती केली आहे. परंतु निर्मात्यांकडून त्यांना उत्तर मिळाले नाही.

'महाराज' हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारित असून चित्रपटात मुख्य भूमिकेत जुनैद खान आणि जयदीप अहलावत आहे. हा चित्रपट 1862 च्या महाराज बदनाम प्रकरणावर आधारित आहे, जो भारतातील सर्वात महत्वाच्या कायदेशीर लढाईंपैकी एक मानला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : आजारातून लवकर बरे व्हा; संजय राऊतांची प्रकृती गंभीर, PM नरेंद्र मोदींकडून खास पोस्ट

French fries Recipe : घरीच बनवा स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत फ्रेंच फ्राइज, एक घास खाताच महागड्या हॉटेलची चव विसराल

Maharashtra Live News Update खोल समुद्रात इंजिन बंद पडल्याने मच्छीमार बोट अडकली

Tulsi Vivah 2025: तुळशी विवाहच्या दिवशी ही गोष्ट नक्की करा, बदलेल तुमचं नशीब

Political News : शिंदेंना मोठा धक्का, ज्येष्ठ नेत्याचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र', काँग्रेसमध्ये केला प्रवेश

SCROLL FOR NEXT