Lust Stories 2 Teaser Shared On Social Media Instagram
मनोरंजन बातम्या

Lust Stories 2 Teaser: ‘लग्नाआधी टेस्ट ड्राइव्ह का नाही?’ नीना गुप्ताचं वक्तव्य चर्चेत, ‘लस्ट स्टोरी २’ चा टीझर पाहिला का?

Lust Stories 2 Teaser Shared On Social Media: बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘लस्ट स्टोरी २’चा नुकताच टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. नवीन कलाकर असलेला टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

Chetan Bodke

Lust Stories 2 Teaser Release: बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘लस्ट स्टोरी २’ (Lust Stories 2) चा नुकताच टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. नवीन कलाकर असलेला टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. वेबसीरिजचा टीझर पाहून सर्वांनाच नेमकं दुसऱ्या भागात काय बघायला मिळणार याची उत्सुकता लागली. या वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत काजोल देवगण, नीना गुप्ता, तमन्ना भाटिया, विजय वर्मा, मृणाल ठाकूर आणि विजय वर्मा यांच्यासह अनेक स्टार कास्ट यामध्ये आहेत. ही वेबसीरिज ‘नेटफ्लिक्स’ (Netflix) वर प्रदर्शित होत असून प्रदर्शनाची तारीख अद्याप गुलदस्त्यात आहे.

‘लस्ट स्टोरी’ बद्दल बोलायचे तर, त्याचा पहिला भाग २०१८ मध्ये रिलीज झाला होता. चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या सीरिजचे दिग्दर्शक अनुराग कश्यप, झोया अख्तर, दिबाकर बॅनर्जी आणि करण जोहर यांचा समावेश होता. स्त्रियांच्या कामुक भावनेबद्दलच्या विविथ कथा यात आधुनिक दृष्टीकोनातून प्रेक्षकांसमोर मांडल्या होत्या. वेबसीरिजच्या पहिल्या भागात मुख्य भूमिकेत राधिका आपटे, भूमी पेडणेकर, मनीषा कोईराला, कियारा अडवाणी आणि आकाश ठोसर, विकी कौशल, नेहा धुपिया यांच्यासह इतर स्टार्स होते.

‘लस्ट स्टोरी २’च्या शेअर केलेल्या टीझरमध्ये, टीझरच्या सुरूवातीलाच नीना गुप्ता म्हणतात, “एखादी नवीन कार घेण्याआधी टेस्ट ड्राइव्हचा पर्याय दिला जातो, तसाच पर्याय लग्नाच्या बाबतीतही असायला हवा...” हे ऐकून काजल हसते. सध्या हा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांना ट्रेलरची खूपच उत्सुकता लागली आहे.

वेबसीरिजच्या दुसऱ्या भागाबद्दल बोलायचे तर, ‘लस्ट स्टोरी २ ’मध्ये चार वेगवेगळे दिग्दर्शक चार कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यात अमित रविंद्रनाथ शर्मा, कोंकना सेन शर्मा, आर. बाल्की आणि सुजॉय घोष यांचा समावेश आहे. येत्या 29 जून रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘लस्ट स्टोरीज २’ प्रदर्शित होणार आहे.

या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिकेत अमृता सुभाष, अंगद बेदी, काजोल देवगण, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर, नीना गुप्ता, तमन्ना भाटिया, तिलोत्तमा शोम आणि विजय वर्मा आहेत. तमन्ना आणि विजयला या वेबसीरिजमध्ये एकत्र पाहून खूश झाले आहेत. दोघांच्याही डेटिंगची चर्चा सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपुर्वी होत होती. टीझर पाहून सर्वांचेच कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT