Bollywood Celebrity Voted For Maharashtra Lok Sabha Election in Mumbai ANI
मनोरंजन बातम्या

Maharashtra Election 2024: अक्षय कुमार, जान्हवी कपूरसोबत अनेक सेलिब्रिंटीनी केलं मतदान, चाहत्यांनाही केलं आवाहन

Bollyowood Celebrity Voted For Maharashtra Lok Sabha Election 2024: देशभरात आज पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.नागरिकांनी मतदान करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांसोबतच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मतदान केले आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, जान्हवी कपूर, फरहान अख्तरने मतदान केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देशभरात आज पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. आज महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच एकूण १३ मतदारसंघात मतदान होणार आहे. आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. नागरिकांनी मतदान करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांसोबतच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मतदान केले आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, जान्हवी कपूर, फरहान अख्तरने मतदान केले आहे.

भारताचे नागरिकत्व परत मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अक्षय कुमारने मतदान केले आहे. अक्षय कुमारने काल सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर त्याने आज सकाळीच मतदान केले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना अक्षय कुमारने सांगितले की, आज मतदान करण्यासाठी नागरिकांनी खूप गर्दी केली आहे. मतदानकेंद्रावर जवळपास ५००-६०० लोक लाइनमध्ये उभे होते, याचा मला आनंद आहे. सर्वांनी मतदान करायला हवे.

अक्षय कुमारसोबतच जान्हवी कपूर, फरहान अख्तर आणि झोया अख्तर आणि राजकुमार रावने मतदानाचा अधिकार बजावला आहे. काल अनेक सेलिब्रिटींनी मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. शाहरुख खान, अक्षय कुमारने नागरिकांनी मतदान करण्यास सांगितले आहे.

मुंबईत आज पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील १३ मतदारसंघात मतदान होत आहे. यामध्ये दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, वायव्य मुंबई या जागांचा समावेश आहे. याशिवाय ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, धुळे, दिंडोरी, आणि भिवंडी अशा १३ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT