Payal Rohatgi Saam Tv
मनोरंजन बातम्या

'मी कधीच आई बनू शकत नाही', गुपित सांगताना ढसाढसा रडली अभिनेत्री

Lock Up Show: मुन्नवर फारुखीनंतर आता अभिनेत्री पायल रोहतगीने देखील ‘लॉक अप’ मध्ये एक धक्कादायक खुलासा केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कंगना राणौतचा ‘लॉक अप’ (Lock Upp) हा शो चर्चेत आला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघायला मिळणारा हा शो स्पर्धकांच्या सीक्रेट्समुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आतापर्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. मुन्नवर फारुखीनंतर आता अभिनेत्री पायल रोहतगीने (Payal Rohatgi) देखील एक धक्कादायक खुलासा केला आहे. पायलचा हा खुलासा ऐकून तिचे चाहतेही भावून झाले आहे. (Lock Upp Payal Rohatgi Cries And Reveals She Can Not Get Pregnant)

येत्या काही दिवसांत विवाह बंधनात अडकणार असणाऱ्या पायलने कॅमेऱ्यासमोर एक गुपित उघड केलंय. आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना पायल म्हणाली की, मी कधीही आई बनू शकत नाही. इतकंच नाही तर पायलने खुलासा केला आहे की, आई बनण्यासाठी तिने IVF देखील केला आहे, परंतु तिचा हा प्रयत्न देखील अपयशी ठरला. चाहत्यांसमोर या गोष्टी शेअर करताना अश्रू आवरता आले नाहीत. ती ढसाढसा रडली.

'म्हणून आतापर्यंत लग्न केलं नाही'

पायलने खुलासा केला की, संग्राम आणि त्याने अनेक वेळा प्रयत्न केले पण अपयश आले. त्यामुळेच मी अद्याप बॉयफ्रेन्ड संग्राम सिंगसोबत लग्न केलेलं नाही. जेव्हा मी गरोदर राहील, तेव्हा लग्न करू,असं मी ठरवलं होतं. यासाठी मला मानसिक आणि शारीरिक तंदुरूस्त व्हायचं आहे. मात्र, चार-पाच वर्ष प्रयत्न करुन सुद्धा आम्हाला अपयश आलं. आता संग्रामला सुद्धा कळून चुकलं की, मी कधीच आई बनू शकत नाही. त्यामुळे मी त्याला सांगितलं की, तू दुस-या कोणाशी तरी लग्न कर, जी तुला तुझं मुल देऊ शकते, असं सीक्रेट पायलने ‘लॉक अप’ या शोमध्ये उघड केलं.

पायल-संग्राम जुलैमध्ये करणार लग्न

काही दिवसांपूर्वी संग्राम हा 'लॉक अप'मध्ये आला होता. यावेळी संग्राम याने बोलताना म्हटलं होतं की, पायलसारख्या स्वतंत्र आणि सशक्त मुलीला गमावणं हे त्याला शक्य नाही. त्यावेळी त्याने लॉकमध्येच पायलला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. हे पाहून पायल फारच आनंदी झाली होती. जुलैमध्ये पायलच्या वाढदिवशी लग्न करण्याचा संग्रामचा विचार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :तीन दिवसांपूर्वी उद्घाटन झालेला पलावा पूल पुलावरील रस्त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत

Amla Chutney : जेवणासोबत रोज लोणचं कशाला? घरीच करा चटपटीत आवळ्याची चटणी

OYO Hotel: कपल्सची होणार गोची? तासांवर रूम मिळणं होणार कठिण? VIDEO

Nagpur Tourism : नागपूरमधील विरंगुळ्याचे ठिकाण, 'येथे' घ्या क्षणभर विश्रांती

Shocking: 'ती'ओरडत राहिली पण..१० वर्षीय चिमुकलीचे नराधम पित्याने लचके तोडले, आईला कळताच..

SCROLL FOR NEXT