LEO 4th Day Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

LEO 4th Day Collection: थलापती विजयच्या ‘लियो’चा बॉक्स ऑफिसवर जलवा; चौथ्या दिवशी केली बक्कळ कमाई

LEO Box Office Collection: पहिल्याच विकेंडला चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळला असून येत्या काही दिवसात हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे.

Chetan Bodke

LEO 4th Day Box Office Collection

थलापती विजयच्या ‘लियो’ची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. १९ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळतोय. चित्रपटाला चाहत्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत असताना, कमाईचा आलेख सध्या मध्यम दिसत आहे. पहिल्याच विकेंडला चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळला असून येत्या काही दिवसात हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. बॉक्स ऑफिसवर आपली खास जादू दाखवणाऱ्या ‘लियो’ने चौथ्या दिवशी दिलासादायक कमाई केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टॉलिवूड सिनेसृष्टीमध्ये लोकेश कनगराज आणि थलापती विजयची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. या दोघांच्याही चित्रपटाचा फक्त दक्षिण भारतातच नाही तर, अन्य भागातही मोठा चाहतावर्ग आहे. नुकतंच सॅकल्निकच्या अहवालानुसार, लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘लियो’ चित्रपटाने चौथ्या दिवशी देशभरामध्ये ४९ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने तमिळनाडू राज्यात २८ कोटी, केरला राज्यात ८ कोटी, कर्नाटकात ५ कोटी, आंध्रप्रदेश ४ कोटी तर उर्वरित कमाई देशातील अन्य शहरातील आहे. चित्रपटाने आतापर्यंत देशभरात १८१ कोटींची कमाई केली आहे.

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, विजय थलापतीच्या ‘लियो’ने पहिल्या दिवशी १४८.५ कोटींचे जागतिक कलेक्शन केले आहे. तर चित्रपटाने पहिल्याच दिवशी एकट्या भारतात ६४.८० कोटींची कमाई केली आहे. तर, दुसऱ्या दिवशी भारतात ३६ कोटी कमावले आहेत. तर तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ४० कोटींची कमाई केली होती. भारतामध्ये लोकेश कनगराज आणि थलापती विजयच्या चित्रपटाने चार दिवसात दिलासादायक कमाई करत सर्वांचे लक्ष वेधले.

‘लिओ’ हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन लोकेश कनागराज यांनी केले आहे. चित्रपटाची पटकथा रत्नाकुमार आणि धीरज वैद्य यांनी लिहिली आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये संजय दत्त, त्रिशा, अर्जुन सर्जा, मायस्किन, गौतम वासुदेव मेनन, मन्सूर अली खान, प्रिया आनंद आणि सँडी यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘लिओ’ चित्रपटाची निर्मिती सेव्हन स्क्रीन स्टुडिओने केली असून अनिरुद्ध रविचंदरने संगीत दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Fasting: गुरुवारी उपवास केल्याने कोणते लाभ होतात?

Maharashtra Live News Update: २८ वर्षीय महिलेचा दीड वर्षाच्या मुलासह विहिरीत आढळला मृतदेह, परभणीतील घटना

Rahul Gandhi : मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका; राहुल गांधींची कोर्टात माहिती

MSRTC: लाडक्या बहिणींची सरकारला रक्षाबंधनाची भेट, ST महामंडळाची ४ दिवसांत सुस्साट कमाई

पालघरमध्ये कुऱ्हाडीने हल्ला; आरोपीला झाडाला बांधलं अन...; धक्कादायक कृत्यानं परिसरात खळबळ|VIDEO

SCROLL FOR NEXT