Tiger 3 First Song Leke Prabhu Ka Naam Song Released Instagram
मनोरंजन बातम्या

Leke Prabhu Ka Naam Song Released: ‘टायगर ३’ मधलं पहिलं गाणं रिलीज, ‘लेके प्रभु का नाम’मध्ये सलमान-कतरिनाने केल्या जबराट हूक स्टेप्स

Tiger 3 Film First Song Released: ‘टायगर ३’ मधलं पहिलं वहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे.

Chetan Bodke

Tiger 3 First Song Leke Prabhu Ka Naam Song Released

सध्या सोशल मीडियावर ‘टायगर ३’मुळे सलमान खान आणि कतरिना कैफ प्रचंड चर्चेत आहे. चित्रपट दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अर्थात १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता.

आता त्यानंतर चित्रपटातलं पहिलं वहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमान आणि कतरिनाचे चाहते या गाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. नुकतंच निर्मात्यांनी अरिजित सिंगच्या आवाजातले पहिले गाणे रिलीज केले आहे. ‘लेके प्रभु का नाम’ असं गाण्याते बोल असून गाण्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होतेय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या अनेक दिवसांपासून गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. कतरिनाचा सध्या सोशलल मीडियावर लूक चांगलाच व्हायरल होत आहे. कतरिनाने ब्लॅक अँड व्हाईट टू पीस घातला असून त्यावर निऑन ग्रीन रंगाचा श्रग घेतला आहे. कॅटचा हा नवा लूक चित्रपटातला असून सोशल मीडियावर तिच्या नव्या लूकची चर्चा होतेय. हे एक पार्टी सॉंग असून गाण्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होतेय.

‘लेके प्रभु का नाम’ या गाण्याला अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांनी आवाज दिला आहे. नऊ वर्षांनंतर अरिजीतने सलमानसाठी पुन्हा एकदा गाणं गायलं आहे. एकीकडे सलमान- कतरिनाच्या डान्स कौशल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. तर दुसरीकडे सलमान- कतरिनाला नेटकरी गाण्यावरुन ट्रोल करित आहे. अवघ्या काही वेळातच युट्यूबवर ‘लेके प्रभु का नाम’ या गाण्याला काही मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळाले असून लाखो लाईक्स मिळाले.

‘टायगर ३’ हा चित्रपट यशराज फिल्म्सचा स्पाय युनिव्हर्सचा चित्रपट आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत सलमान खान, कतरिना कैफसोबत इम्रान हाश्मी दिसणार आहे. या ॲक्शनपटात टायगरच्या भूमिकेत सलमान, झोयाच्या भूमिकेत कतरिना तर खलनायकाच्या भूमिकेत इम्रान हाश्मी दिसणार आहे. सोबतच चित्रपटामध्ये शाहरुख कॅमिओ करणार आहे. ‘टायगर ३’ दिवाळीच्या मुहूर्तावर १२ ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून तमिळ, तेलुगू आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT