Siddhartha Jadhav Birthday: मराठीसोबतच बॉलिवूड चित्रपट गाजवणाऱ्या 'सिद्धू'चा प्रेरणादायी प्रवास, रोहित शेट्टीच्या चित्रपटानं बदलवलं आयुष्य

Siddhartha Jadhav Birthday Special: सिद्धार्थ जाधव एक उत्कृष्ट अभिनेत्यासोबतच उत्कृष्ट कॉमेडियन देखील आहे. सिद्धार्थला सध्या कोणत्याही परिचयाची गरज नाही.
Siddhartha Jadhav Birthday
Siddhartha Jadhav BirthdaySaam Tv
Published On

Happy Birthday Siddharth Jadhav:

आपल्या दमदार स्टाईल आणि अभिनयाद्वारे प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या सर्वांचा लाडका 'सिद्धू' अर्थात मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवचा (Siddhartha Jadhav Birthday) आज वाढदिवस आहे. सिद्धार्थ जाधव एक उत्कृष्ट अभिनेत्यासोबतच उत्कृष्ट कॉमेडियन देखील आहे. सिद्धार्थला सध्या कोणत्याही परिचयाची गरज नाही.

नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांद्वारे सिद्धार्थ जाधव प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. फक्त मराठी चित्रपटच नाही तर हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये सिद्धार्थने काम केले आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर कोणत्याही भूमिकेला सिद्धार्थ जाधव न्याय देतो. सिद्धार्थच्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्याचा फिल्मी प्रवास पाहणार आहोत...

सिद्धार्थ जाधव यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1981 रोजी रत्नागिरीमध्ये झाला. तो त्याच्या आई-वडिलांचा चौथा मुलगा आहे. त्यांच्या वडिलांचे नाव रामचंद्र आणि आईचे नाव मंदाकिनी जाधव आहे. सिद्धार्थ जाधव मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. सिद्धार्थचे बालपण मुंबईतल्या शिवडीमध्ये गेले. त्याने प्राथमिक शिक्षण शिवडी महापालिका मराठी शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर दादरच्या नायगाव परिसरातील सरस्वती हायस्कूलमधून त्याने माध्यमिक शिक्षण घेतले. रुपारेल कॉलेजमधून त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Siddhartha Jadhav Birthday
Leke Prabhu Ka Naam Song Released: ‘टायगर ३’ मधलं पहिलं गाणं रिलीज, ‘लेके प्रभु का नाम’मध्ये सलमान-कतरिनाने केल्या जबराट हूक स्टेप्स

सिद्धार्थला आधीपासूनच अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना तो नाटकांमध्ये काम करायचा. असे करता करता सिद्धार्थला चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका मिळू लागल्या. त्याने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात मराठी चित्रपटसृष्टीपासून केली. त्याने विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारून आपली छाप सोडली.

मराठी चित्रपटसृष्टीत आपले कौशल्य सिद्ध केल्यानंतर सिद्धार्थ जाधव टीव्हीकडे वळला आणि पहिल्याच शोमधून तो छोट्या पडद्यावर प्रसिद्ध झाला. हा शो 2006 मध्ये प्रसारित झालेला 'बा बहू और बेबी' होता. या शोद्वारे लोकांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतरच त्याला 'साराभाई वर्सेस साराभाई' ही मालिका मिळाली. या मालिकेद्वारे त्याने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. सिद्धार्थ जाधवने 2012 मध्ये 'कॉमेडी सर्कस के अजुबे'द्वारे प्रेक्षकांना हसवलं. या शोमध्ये स्टँडअप कॉमेडियन भारतीसोबत त्याने काम केले.

Siddhartha Jadhav Birthday
Bigg Boss 17 First Eviction: 'विकेंड का वार' मध्ये सलमान कोणावर बरसला?, मन्नारा, नाविद का अभिषेक? कोण गेलं घराबाहेर...

2006 मध्ये सिद्धार्थ जाधवची भेट अशा एका व्यक्तीसोबत झाली ज्याच्यामुळे त्याचे आयुष्यच बदलले. बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शक रोहित शेट्टीमुळे सिद्धार्थ जाधवला बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळाली. रोहित शेट्टीने 'गोलमाल' या कॉमेडी चित्रपटात सिद्धार्थ जाधवला ब्रेक दिला. 'गोलमाल'मधील सिद्धार्थ जाधवची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या चित्रपटानंतर 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या रोहित शेट्टीच्या 'सिम्बा' चित्रपटात देखील सिद्धार्थ जाधवला काम मिळाले.

Siddhartha Jadhav Birthday
Prajakta Mali And Aditi Tatkare Photos: ‘दोघींनीही एकत्र काम करावं का?’ प्राजक्ता माळीने मंत्री आदिती तटकरेंना विचारला जबरदस्त प्रश्न; फोटोवर फॅन्स म्हणाले...

रोहित शेट्टीसोबत दोन चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर सिद्धार्थ जाधवला बॉलिवूडचा 'भाईजान' अर्थात अभिनेता सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. सलमान खानच्या 'राधे' चित्रपटात सिद्धार्थने काम केले. या चित्रपटात त्याने रणजीतची भूमिका साकारली होती. मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची जादू दाखवणाऱ्या सिद्धार्थने बंगाली चित्रपटात देखील काम केले. त्याने ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तीसोबत 'अमी सुभाष बोलची' या बंगाली चित्रपटात काम केले. यासोबतच सिद्धार्थ अनेक रिअॅलिटी शोमध्येही दिसला आहे. सिद्धार्थला मराठी चित्रपटात साकारलेल्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी झी टॉकीज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Siddhartha Jadhav Birthday
Dharmaveer 2 Movie: 'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' 'धर्मवीर २' मधून उलगडणार, ठाण्यातून चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com