Udit Narayan Birthday SAAM TV
मनोरंजन बातम्या

Udit Narayan Birthday : उदित नारायण एका गाण्यामुळे झाले रातोरात स्टार, 'रोमँटिक गाण्यांचे बादशाह' म्हणून प्रसिद्ध

Udit Narayan Most Famous Song: बॉलिवूडचे लोकप्रिय गायक उदित नारायण यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना बॉलिवूडमध्ये 'रोमँटिक गाण्यांचे बादशाह' म्हणून ओळखले जाते.

Shreya Maskar

बॉलिवूडला अनेक सुरेल आवाजाचे गायक लाभले आहेत. कोणताही चित्रपट गाण्यांशिवाय अधूरा आहे. गाणी चित्रपटाचे सौंदर्य वाढवतात. आज अशाच एका गायकाचा वाढदिवस आहे. ज्यांना बॉलिवूडमध्ये 'रोमँटिक गाण्यांचे बादशाह' म्हणून ओळखले जाते. ते प्रसिद्ध गायक म्हणजे अनेकांचे आवडते गायक उदित नारायण (Udit Narayan Birthday) होय.

गायक उदित नारायण यांनी ९०चे दशक गाजवले आहेत. त्यांच्या सुरेल आवाजाने त्यांनी प्रेक्षकांना वेड लावले आहे. त्यांच्या गाण्यांची आजही भन्नाट क्रेझ पाहायला मिळते. अशा गायक उदित नारायण यांचा आज (1 डिसेंबर) रोजी वाढदिवस आहे.

उदित नारायण यांचा जन्म बिहारमध्ये झाला. यांनी अनेक हिंदी, तमिळ, बंगाली, मल्याळम अशा विविध भाषांमध्ये गाणी गायली आहेत. आज या दिग्गज गायकाचा 69वा वाढदिवस आहे. त्यांनी अनेक चित्रपटात प्लेबॅक सिंगर म्हणूनही काम केले आहे. तसेच त्यांचे अनेक अल्बमही गाजलेले आहे. उदित नारायण यांनी आपल्या करिअरची सुरुवात नेपाळी इंडस्ट्रीतून केली. मात्र बॉलिवूडमध्ये त्यांचे नशीब या गाण्यामुळे उजळले आणि ते प्रसिद्धीच्या झोतात आले.

उदित नारायण यांचे 'पापा कहता है बडा नाम करेगा' हे गाणे खूप जास्त लोकप्रिय झाले. या गाण्यामुळे खऱ्या अर्थाने उदित नारायण यांच्या करिअरला सुरूवात झाली. यानंतर त्यांनी अनेक हिट गाणी गायली. त्यांचे 'पापा कहता है बडा नाम करेगा' हे गाणे खूप सुपरहिट झाले. हे गाणे 'कयामत से कयामत तक' या चित्रपटातील आहे. या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत आहे. तसेच या गाण्यासाठी उदित नारायण यांना अनेक पुरस्कार देखील देण्यात आले.

उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण देखील प्रसिद्ध गायक आहे. त्याने देखील आपल्या सुरेल आवाजाने चाहत्यांना वेड लावले आहे. अनेक वेळा हे बाप-लेक एकत्र गाणी गाताना कार्यक्रमात पाहायला मिळतात. आदित्य नारायण हे एक अभिनेता आणि उत्तम होस्ट देखील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चिंचवडमध्ये मॉलजवळ मोठी आग

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा गुंडाराज! शिवीगाळ करत तरुणावर कोयत्याने हल्ला, मारहाणीचा थरारक व्हिडीओ व्हायरल

Besan Barfi Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी झटपट घरी बनवा टेस्टी बेसन बर्फी

Guhagar Tourism : बालीची आठवण करणारा गुहागर समुद्रकिनारा! One Day ट्रिपसाठी बेस्ट प्लॅन इथे वाचा

Divya Deshmukh : 'बुद्धीबळाची राणी' दिव्यावर पैशांचा वर्षाव; 'वर्ल्ड चॅम्पियन'ला किती रक्कम मिळाली? वाचा

SCROLL FOR NEXT