Anuradha Paudwal Extended Helping Hand To Irshalwadi  Saam TV
मनोरंजन बातम्या

Anuradha Paudwal At Irshalwadi Landslide : अनुराधा पौडवाल यांनी घेतली इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्तांची भेट; मदतीची केली विनंती

Anuradha Paudwal : गायिका अनुराधा पौडवाल यांनी देखील इर्शाळवाडीला भेट देऊन मदतीचा हात पुढे केला आहे.

Pooja Dange

Anuradha Paudwal Extended Helping Hand To Irshalwadi : महाराष्ट्रातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. संपूर्ण गाव झोपले असताना अचानक आवाज येऊ लागला. कोणाला काही कळण्या आताच होत्याच नव्हतं झालं होतं.

या दुर्घटनेत अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक राजकणारी या ठिकाणी भेट देऊन तेथील परिस्थिती जाऊन घेत आहेत. तसेच दुर्घटनाग्रस्तांना सहकार्य करत आहेत. (Latest Entertainment News)

नुकतीच उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे यांनी इर्शाळवाडीला भेट दिली आहे. तर दिग्गज गायिका अनुराधा पौडवाल यांनी देखील इर्शाळवाडीला भेट देऊन मदतीचा हात पुढे केला आहे.

अनुराधा पौडवाल यांनी यावेळी सांगितले की, 'माणुसकीच्या नात्याने सर्वांनी सढळ हाताने मदत करा. त्यांना आत्मविश्वास देणे गरजेचे आहे. जी काही थोडीफार मदत तुम्ही करू शकता ती करा. तुमचा मदतीचा हात तुम्ही पुढे करा.' अशी विनंती अनुराधा यांनी केली आहे.

अनुराधा पौडवाल यांनी सरकारच्या पॉलिसीप्रमाणे जी काही मदत असेल ती करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी घर बांधून देणार असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या सर्वोदय फाउंडेशनमार्फत जी काही मदत करता येतील ती त्या करणार असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.

खालापूर येथील इर्शाळवाडीत दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा २६ वर पोहचला आहे. बचाव पथकाकडून आतापर्यंत २६ जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. बुधवारी रात्री झालेल्या या दुर्घटनेनंतर येथे बचावकार्य सुरू आहे.

कोल्हापुरातील व्हाईट आर्मीचे २१ जवान बचावकार्यासाठी दुर्घटनास्थळी पोहचलेले आहेत. मातीच्या ढिगाऱ्या खाली सापडलेल्या गावकऱ्यांना बाहेर काढण्याचा काम व्हाईट आर्मीचे जवान करत आहेत.

देशभरात कुठेही नैसर्गिक आपत्ती झाली की कोल्हापुरातील व्हाईट आर्मीचे जवान मदतीसाठी धावून जात असतात, इर्शाळ वाडीत शासकीय यंत्रणेसोबत बचाव कार्य करत आहेत. (News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

Maharashtra News Live Update: शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! दूध वाढवण्यासाठी म्हशींना दिली जात होती बंदी असलेली इंजेक्शन्स

Jennifer Winget Marriage: घटस्फोटाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

Corn Appe Recipe : नाश्त्याला पोहा-उपमा खाऊन कंटाळा आला? ट्राय करा मऊशार मका आणि रव्याचे आप्पे; झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT