राज कुंद्राला सोडून शिल्पा शेट्टी करणार नव्या आयुष्याची सुरुवात?  Saam Tv
मनोरंजन बातम्या

राज कुंद्राला सोडून शिल्पा शेट्टी करणार नव्या आयुष्याची सुरुवात?

सर्व वादविवादांपासून दूर जात शिल्पा आपल्या मुलांसह एक नवीन आयुष्य सुरू करण्याच्या विचारात आहे अशी चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये मध्ये सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिल्पा शेट्टी : पोर्नोग्राफिक चित्रपट निर्मितीप्रकरणी व्यावसायिक व अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीचा पती राज कुंद्रा Raj Kundra 19 जुलै पासून मुंबई गुन्हे शाखेने Mumbai Crime Branch अटक केल्यापासून शिल्पा शेट्टीचे Shilpa Shetty आयुष्य संपूर्णपणे बदलले आहे. राज कुंद्रा जामिनासाठी Bail प्रयत्न करत आहे. या सर्व वादविवादांपासून दूर जात शिल्पा आपल्या मुलांसह एक नवीन आयुष्य सुरू करण्याच्या विचारात आहे अशी चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये B-Town मध्ये सुरू आहे. तर माहितीनुसार, ती राज कुंद्रा आणि तिच्या जुहू Juhu इथल्या घरातून निघून जाणार असल्याचे चर्चा आहे. शिल्पाच्या एका मैत्रिणीने नुकतीच एक मुलाखत दिली आणि तेव्हापासून चर्चेला सुरुवात झाली.

हे देखील पहा-

'राज कुंद्राच्या अडचणीमध्ये वाढ होत आहे. काही दिवसांच्या अंतराने त्यामध्ये आणखी भर पडत आहे. त्यामुळे शिल्पाने राजच्या पैशांपासून सुद्धा लांब राहणंच ठरवले आहे. ती स्वत: पुरेशी रक्कम कमावते आणि त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीमधून अनेकजण तिच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत', अशी माहिती शिल्पाच्या मैत्रिणीने दिली.

पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीलाही कायदेशीर कारवाईचा भाग व्हावे लागले होते. पोलिसांनी या प्रकरणात शिल्पा शेट्टीचीही चौकशी केली आणि तिचे बँक खाते तपासले. या घटनेमुळे शिल्पा आणि तिच्या कुटुंबाची प्रतिमा खराब झाली आहे. अशा परिस्थितीत आता शिल्पा आणि राज कुंद्रा यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा ऐकू येत आहेत. बातमीनुसार, असे सांगितले जात आहे की, शिल्पा पती राज कुंद्रापासून विभक्त होण्याचा विचार करत आहे. ती आता या नात्यावर खुश नाही. यामुळेच तिला राजपासून वेगळे व्हायचे आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

SCROLL FOR NEXT