Laxmikant Berde Saam Tv
मनोरंजन बातम्या

Laxmikant Berde: "एकटा माणूस विनोद करू शकत नाही"...लाडक्या लक्ष्याने दिला होता हा खास सल्ला

सर्वाधिक त्याची मैत्री होती ती, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांच्यासोबत. या तिघांची ही मैत्री नेहमी विनोदासाठी खास प्रिय होती.

Chetan Bodke

Laxmikant Berde: आपल्या विनोदाने लाडक्या प्रेक्षक वर्गाला हसवणाऱ्या लक्ष्याची आज १८वी पुण्यतिथी. त्याच्या निखळ मनोरंजनाने फक्त प्रेक्षक पोट धरुन हसत नाहीत तर कलाकारही त्याच्यासोबत काम करताना हसतात. लक्ष्याचे मराठी चित्रपटसृष्टीतील मित्र फार नाहीत. त्याने अवघ्या चित्रपटसृष्टीत हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच मित्र कमवले आहेत.

सर्वाधिक त्याची मैत्री होती ती, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांच्यासोबत. या तिघांची ही मैत्री नेहमी विनोदासाठी खास प्रिय होती. ही त्रिकुट जोडी प्रेक्षकांना आपल्या मनोरंजनाने नेहमी हसवत आली आहे. काही वर्षांपूर्वी लक्ष्मीकांत बेर्डेने दुरदर्शनला एक मुलाखत दिली होती. त्यावेळी त्याने त्याच्या अनेक खासगी आयुष्यावर चर्चा केली होती.

यावेळी त्याने त्याच्या विनोदावर खास भाष्य केले होते, यावेळी तो म्हणतो, " जेव्हा आपण कोणत्याही कलाकृतीसाठी कॉमेडी करतो त्यावेळी समोरचा कलाकार देखील फार महत्वाचा असतो. आपणच एकटा सर्व कॉमेडी येऊन करुन जातो हे कुणालाच शक्य नाही. कॉमेडी कधीच एकामुळे यशस्वी होत नाही. दोघांनाही प्रेक्षकांना हसवावे लागते. कॉमेडी करताना एकमेकांना अॅक्शन रिअॅक्शन करणे फार महत्वाचे असते. त्यामुळे आपल्यासोबत जो कलाकार असतो, तो कॉमेडी करणारा जर असेल तर फार उत्कृष्ट होते."

लक्ष्मीकांतने आपल्या विनोदी शैलीने 'दे दणादण', 'धूमधडाका', 'अशी ही बनवाबनवी', 'थरथराट', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', 'झपाटलेला' हे चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उपराजधानी नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार

Banana Kofta Recipe: पावसाळ्यात तोंडाला पाणी सुटेल अशी केळी कोफ्ता करी कशी बनवायची? वाचा सोपी रेसिपी

Horoscope Wednesday Update : महत्वाच्या कामात येईल अडथळा, वाचा आजचे राशीभविष्य

हळदीत वहिनींचा डान्स पाहून सगळे घायाळ; ''चोली के पीछे'' गाण्यावर दिला जबरदस्त परफॉर्मन्स

Bharat Band: आज भारत बंद! काय सुरु आणि काय बंद राहणार? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT