Laxmichya Paulanni  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Laxmichya Paulanni : 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत धक्कादायक ट्विस्ट; ईशा केसकरची एक्झिट तर नवीन नायिकेची एन्ट्री, पाहा VIDEO

Laxmichya Paulanni Marathi Serial Update : 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेत धक्कादायक वळण पाहायला मिळत आहे. मालिकेची मुख्य अभिनेत्री ईशा केसकरची एक्झिट झाली आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे.

Shreya Maskar

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेतून ईशा केसकरची एक्झिट झाली आहे.

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत नवीन अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेतील धक्कादायक ट्विस्ट पाहून चाहते नाराज आहेत.

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला आहे. मालिकेत आता नवीन कथा पाहायला मिळणार आहे. तसेच नवीन अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले आहे. मालिकेतील अद्वैत-कलाची जोडी खूप गाजली. या मालिकेत कलाची भूमिका ईशा केसकरने साकारली. तर अद्वैतची भूमिका अक्षर कोठारीने साकारली आहे.

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेतून ईशा केसकरची एक्झिट झाली असून मालिकेत नवा अध्याय सुरू झाला आहे. आता 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत नवीन अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरने एन्ट्री घेतली आहे. याचा खास प्रोमो शेअर करण्यात आला आहे. लवकरच मालिकेत अद्वैत आणि सुकन्या समोरासमोर येणार आहेत. सध्या मालिकेत अद्वैत-कलाचे लग्न पाहायला मिळत होते. त्यात कलाला घरातील मोठे सत्य समजते. ज्यामुळे तिचा ठरवून अपघात होतो. या अपघातात कलाचे निधन झालेले दाखवणार आहे.

नवीन प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, आबा आणि अद्वैत मंदिराच्या खाली उभे असतात. मात्र अद्वैत मंदिरात जाण्यास नकार देतो. कारण खरे गेल्यामुळे अद्वैतला मोठा धक्का बसतो. नक्षत्रा मेढेकर मालिकेत सुकन्या हे पात्र साकारणार आहे. सुकन्यानेच कलाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. कलाने आपले हृदय देऊन सुकन्याचे प्राण वाचवल्याचे मलिकेत पुढे पाहायला मिळणार आहे.

मंदिरात सुकन्या आणि अद्वैत एकमेकांना धडकतात. सुकन्या मंदिरात देवाचे आभार मानायला आली असते. मालिकेत सहा वर्षांची लीप दाखवण्यात आली आहे. प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. आता मालिकेत अजून कोणते धक्कादायक बदल होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिका रात्री 9:30 वाजता पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कल्याणमध्ये चाललंय काय? फ्रँकी चालकाला मारहाण, क्षुल्लक कारणावरून राडा, पोलिसांची बघ्याची भूमिका?

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाराशिवमध्ये दाखल

११ वर्षीय शाळकरी मुलावर बिबट्याचा भीषण हल्ला, दप्तरामुळे वाचला जीव, नेमके काय घडले?

'मी मराठी आहे, बिहारींचं ऐकणार नाही', बॉसला अद्दल घडवण्यासाठी महिलेनं घेतली मनसे कार्यकर्त्यांची मदत, VIDEO व्हायरल

Jui Gadkari : डोक्यावर टोपी अन् पायात बूट; जुई गडकरीचा हटके लूक, पाहा Photos

SCROLL FOR NEXT