Sulochana Chavan Passay Away  Saam TV
मनोरंजन बातम्या

Sulochana Chavan: 'रंगल्या रात्री'ने सुरू झालेला जीवनप्रवास थांबला

सुलोचना चव्हाण यांनी १९६२ साली आलेला चित्रपट 'रंगल्या रात्री'मध्ये पहिल्यांदा लावणी गायली.

Pooja Dange

Sulochana Chavan Life Journey: मनोरंजन विश्वासाठी एक दुःखद घटना घडली आहे. लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे आज वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. सुलोचना चव्हाण यांनी त्यांच्या आवाजाने रसिकांच्या मनावर राज्य केले. त्यांचं अनेक लावण्या आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत.

सुलोचना चव्हाण यांचा जन्म मुंबईमध्ये झाला. लग्नाधीचे त्यांचे नाव सुलोचना महादेव कदम असे होते. त्या चौथीपर्यंत शिकल्या होत्या. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांना प्रथम गाण्याची संधी मिळाली. वयाच्या अकराव्या वर्षांपासून सुलोचना यांनी पार्श्वगायन करण्यास सुरूवात केली.

सुलोचना यांनी कोणत्याही प्रकारचे संगीताचे शिक्षण घेतले नव्हते. आवड म्हणून त्या संगीत क्षेत्राकडे वळल्या होत्या. कोणतेही गाणे गाण्याआधी त्या ते संगीतकाराकडून समजून घेत असत. सुलोचना यांनी मराठीसह हिंदी, पंजाबी, गुजराती आणि उर्दूमध्येही गाणी गायली आहेत. (Actress)

वयाच्या विसाव्या वर्षी त्यांचे कोल्हापूरच्या श्यामराव चव्हाण यांच्याशी लग्न झाले. श्यामराव यांनाही संगीताची आवड होती. श्यामराव उत्तम तबला वादक होते. लावणी गाण्याचे प्रशिक्षण सुलोचना यांनी त्यांचे पती श्यामराव यांनी दिले होते. म्हणून सुलोचना त्यांच्या पतींना त्यांचे गुरू मानतात.

सुलोचना चव्हाण यांनी १९६२ साली आलेला चित्रपट 'रंगल्या रात्री'मध्ये पहिल्यांदा लावणी गायली. नाव कशाला पुसता, मला हो म्हणतात लवंगी मिरची या लावण्यांनी त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

'खेळताना रंग बाई होळीचा', 'पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा', 'सोळावं वरीस धोक्याचं', 'फड सांभाळ तुऱ्याला ग आला', 'राग नका धरू सजना', 'पाडाला पिकला आंबा', 'लाडे लाडे बाई करू नका' या त्यांच्या गाजलेल्या लावण्या आहेत. (Song)

२०१० साली सुलोचना यांनी राज्यशासनाचा संगीत क्षेत्रातील अत्यंत मनाचा 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर' पुरस्कार मिळाला. २०२२ साली भारत सरकारने 'पद्मश्री' हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. सुलोचना चव्हाण यांनी 'माझं गाणं... माझं जगणं' हे आत्मचरित्र लिहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT