Sulochana Chavan : लावणीचा सूर हरपला! ज्येष्ठ ‘लावणीसम्राज्ञी’ सुलोचना चव्हाण यांचं निधन

मराठी मनोरंजन विश्वातून एक दु:खद वार्ता समोर आली आहे. ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचणा चव्हाण यांचं निधन झालं आहे.
Sulochana Chavan Passay Away
Sulochana Chavan Passay Away Saam TV
Published On

Sulochana Chavan Passay Away : मराठी मनोरंजन विश्वातून एक दु:खद वार्ता समोर आली आहे. ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचणा चव्हाण यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज (१० डिसेंबर) त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वृध्दापकाळाने त्यांचे निधन झाल्याच माहिती त्यांचा मुलगा विजय चव्हाण यांनी दिली आहे.

Sulochana Chavan Passay Away
Kedar Shinde: दिग्दर्शक केदार शिंदेंच्या सोशल मीडियावर हॅकर्सचा डल्ला, चाहत्यांना दिला सावध राहण्याचा सल्ला

सुलोचना ताईंचे आणि लावणीचे एक वेगळेच नाते होते. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी ठसकेबाज लावणी गात प्रेक्षकांना चांगलीच भूरळ घातली होती.तब्बल ६० वर्षांहून अधिक काळ मराठी रसिक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुलोचना चव्हाण यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून खालावलेली होती.

काही शस्त्रक्रिया आणि वयोपरत्वे आलेले आजारपण यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर वाजता आज ३ वाजता मरीन लाईन्सच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या अचानक निघून जाण्याने संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com