Gautami Patil  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gautami Patil New Song: गौतमी पाटील पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत , 'चीझ लई कडक' प्रेक्षकांच्या भेटीला

Gautami Patil: 'दिलाचं पाखरू' आणि 'घोटाळा'नंतर गौतमी पाटीलचं आणखी एक गाणं (Gautami Patil New Song) रिलीज झाले आहे. गौतमीचे 'चीझ लई कडक' हे गाणं रिलीज झालं आहे.

Priya More

Cheez Lai Kadak Song:

'सबसे कातील गौतमी पाटील' म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या डान्स आणि अदाकाराच्या माध्यमातून वेड लावणारी गौतमी पाटील (Gautami Patil) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या सगळीकडे एकच चर्चा होते ती म्हणजे गौतमी पाटीलची. राज्यभरामध्ये गौतमी पाटीलचे डान्स शो होतात. या शोला फक्त गौतमीच्या नावानेच मोठी गर्दी होते.

गौतमी पाटील फक्त डान्सचे कार्यक्रम करत नाही तर तिचे अनेक गाणी देखील युट्युबवर आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. अशामध्ये आता 'दिलाचं पाखरू' आणि 'घोटाळा'नंतर गौतमी पाटीलचं आणखी एक गाणं (Gautami Patil New Song) रिलीज झाले आहे. गौतमीचे 'चीझ लई कडक' हे गाणं रिलीज झालं असून त्याला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.

ठसकेबाज गाण्यांवर प्रेक्षकांना ठेका धरायला लावणाऱ्या गौतमी पाटीलच्या नवनवीन गाण्याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. तिचं गाणं म्हणजे तिच्या चाहत्यांसाठी मोठी परवणी असते. आता गौतमी पाटील 'इश्काचा मौका आणि झाला नजरेचा धोका... आता कसं व्हायचं पावन, चीझ मी लई कडक' म्हणत आहे. सप्तसूर म्युझिकच्या नव्याकोऱ्या गाण्यात गौतमी पाटील झळकली असून या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर लाँच करण्यात आला आहे. तिचं हे गाणं सध्या चर्चेत आले आहे.

सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांनी 'चीझ लई कडक' या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. विकी वाघ यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केलेलं हे गाणं वैशाली सामंत यांनी गायलं आहे. तर या गाण्यात गौतमी पाटीलसह कुणाल पाटील, कुणाल मासले, मनोज कुंभार, आदम शेख हे मुख्य भूमिकेत आहेत. अतिशय धमाल शब्द, ठेका धरायला लावणारी उडती चाल असल्याने हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

'चीझ लई कडक' हे फक्त गाणं नाही. यामध्ये गौतमी पाटील पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसत आहे. गुंडांच्या अड्ड्यावर गौतमी पाटील जबरदस्त डान्स करते. आपल्या अदांच्या माध्यमातून ती या गुंडांना घायाळ करते. त्यानंतर या सर्वांना पोलिस अटक करतात हे गाण्यामध्ये दाखवण्यात आले आहे. 'चीझ लई कडक' हे गाणं प्रेक्षकांना वेड लावणार 'आयटम साँग ऑफ द इअर' ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Hindi Language Controversy : "मराठी बोलना जरुरी हैं क्या ?" म्हणणाऱ्या खारघरमधील परप्रांतीय तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी धडा शिकवला

Gold Rates: खरेदीला लागा! सोन्याच्या दरात घसरण, १० तोळं सोनं १,१०० रूपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Monsoon hepatitis symptoms: पावसाळ्यात गर्भवती महिलांना हिपॅटायटीस संसर्गाचा धोका; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Building Scam : ईडीची वसईत १२ ठिकाणी छापेमारी, माजी आयुक्तांच्या घरी टाकली धाड, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT