Gautami Patil Father Passed Away:  Saam tv
मनोरंजन बातम्या

Gautami Patil Father Passed Away: नृत्यांगणा गौतमी पाटीलला पितृशोक; वडील रवींद्र पाटील यांचं पुण्यात निधन

Gautami Patil Father Passed Away: गौतमीचे वडील रविंद्र बाबुराव पाटील यांचं पुण्यातील रुग्णालयात निधन झालं आहे.

Vishal Gangurde

Gautami Patil Father passed away

नृत्यांगणा गोतमी पाटीलच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी हाती आली आहे. गौतमीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गौतमीचे वडील रविंद्र बाबुराव पाटील यांचं पुण्यातील रुग्णालयात निधन झालं आहे. सोमवारी ३ वाजण्याच्या सुमारास गौतमीच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर आज पुण्याच्या धनकवडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. (Latest Marathi News)

प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलचे वडील रवींद्र पाटील हे धुळ्यातील सूरत हायवेवर बेवारस आणि बेशुद्धावस्थेत आढळून आले होते. त्यानंतर धुळ्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी धुळ्यातील हिरे रुग्णालयात दाखल केले होते. गौतमीच्या वडिलांची प्रकृती गंभीर होती. गौतमीला वडिलांची माहिती कळताच त्यांच्या मदतीसाठी धावली होती.

माहिती कळताच गौतमीने धुळ्याच्या माजी महापौर जयश्री अहिरराव यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांना सांगून वडिलांना खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते. रवींद्र पाटील यांचे फोटो सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर गौतमीने वडिलांच्या उपचाराची जबाबदारी उचलत पुण्यात घेऊन आली होती.

गौतमीने वडिलांना पुण्यातील चिंतामणी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, आज सोमवारी ३ वाजता त्यांचं रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. गौतमी पाटीलच्या वडिलांच्या दोन्ही किडन्या आणि लिव्हर निकामी झाले होते. यामुळे गौतमी पाटीलच्या वडिलांचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला. आज त्यांच्यावर पुण्यातील धनकवडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

रवींद्र पाटील यांची ओळख कशी पटली?

रवींद्र पाटील सूरत हायवेवर बेवारस अवस्थेत आढळले होते. धुळ्यात स्वराज्य फाऊंडेशन संस्थेचे दुर्गेश चव्हाण यांना हायवेवर बेवारस अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांनी हिरे रुग्णालयात दाखल केले. रवींद्र पाटील यांच्या खिशात आधारकार्ड आढळल्यानंतर त्यांची ओळख पटली होती. त्यांनी सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिल्यानंतर गौतमीला त्याबद्दल माहिती मिळाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Shukra Gochar: दिवाळीनंतर शुक्र ग्रह करणार गोचर; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार भरपूर नफा

Akola News : मोबाईल विहिरीत पडला; अकोल्यातील पठ्ठ्याने अख्खी यंत्रणा कामाला लावली, नेमकं काय घडलं? VIDEO

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

SCROLL FOR NEXT