Samradnyee Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Lata Mangeshkar Documentry : दिदींचे जीवन डॉक्युमेंटरीतून उलगडणार, संगीतप्रेमींची उत्सुकता शिगेला !

'सम्राज्ञी' असे या डॉक्युमेंटरीचे नाव असून या डॉक्युमेंटरीत लतादीदींचा जीवनपट उलगडला जाणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: गानकोकिळा, गानसम्राज्ञी तथा भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची काल जयंती झाली. दिदींच्या जयंतीचे औचित्य साधत अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेनमेंट्स आणि लतिका क्रिएशन्स हे लतादिदींवर एक डॉक्युमेंटरी (Documentary) बनवणार आहेत. ' सम्राज्ञी' असे या डॉक्युमेंटरीचे नाव असून या डॉक्युमेंटरीत लतादीदींचा जीवनपट उलगडला जाणार आहे.

मुख्य बाब म्हणजे अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत हाताळला जात आहे. (Lata Mangeshkar Documentary Samradnyee) या डॉक्युमेंटरीची जबाबदारी एल.एम. म्युझिकचे सीईओ आणि संगीतकार मयुरेश पै आणि ख्यातनाम निर्माते नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी अगदी सहज पेलली आहे. तर ही डॉक्युमेंट्री मयुरेश पै (Mayuresh Pai) हे दिग्दर्शित करत असून स्वरसम्राज्ञीला या कलाकृतीतून मानाचा मुजरा देण्याचा मानस आहे. डॉक्युमेंटरीचा आशय पाहता निर्माते आणि दिग्दर्शकांनी वेळेची मर्यादा पाळलेली नाही.

लतादीदींचा जन्म मध्यप्रदेशात इंदौर येथे 28 सप्टेंबर 1929 रोजी झाला. संगीत वारसा लहानपणापासून लाभलेल्या दीदींना आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ अशी चार लहान भावंडे होती. वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक आणि या सर्वांचे ते गुरू होते. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली तर 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमधील गाण्यांना आपला आवाज दिला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी लता दीदींची प्राणज्योत मालवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Nachnichi Bhakri Recipe : गावाकडे बनवतात तशी मऊ-लुसलुशीत नाचणीची भाकरी, वाचा परफेक्ट रेसिपी

Marathi Serial Off Air : "...One Last Time"; लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्रीनं केली खास पोस्ट

iPhone युजर्ससाठी धक्का! Truecaller मधील कॉल रेकॉर्डिंग फीचर होणार बंद, बॅकअपसाठी 'असा' उपाय करा

Tulja Bhavani Temple : तुळजाभवानीची गायब तलवार सापडली; महिनाभरापासून गायब होती तलवार, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT