Lakshmi Niwas Saam Tv
मनोरंजन बातम्या

Lakshmi Niwas: 'लक्ष्मी निवास'मध्ये मोठा ट्विस्ट! लक्ष्मी-श्रीनिवासचे घराचे स्वप्न पूर्ण; तर जयंतचा होणार अखेर पर्दाफाश

Lakshmi Niwas Serial : 'लक्ष्मी निवास' मालिकेत लक्ष्मी-श्रीनिवास नव्या घरात गृहप्रवेश करणार आहेत. दुसरीकडे, जान्हवीसमोर जयंतचे खरे रूप उघड होणार असून मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

Shruti Vilas Kadam

Lakshmi Niwas Serial: झी मराठीवरील लोकप्रिय 'लक्ष्मी निवास' मालिकेत प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि थरारक घडामोडींचा डबल डोस पाहायला मिळणार आहे. एका बाजूला अनेक वर्षांचे लक्ष्मी आणि श्रीनिवास यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे, तर दुसऱ्या बाजूला जयंतचे खरे रूप अखेर संपूर्ण कुटुंबासमोर उघड होणार असल्याने मालिकेने नवे वळण घेतले आहे.

मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये लक्ष्मी आणि श्रीनिवास आपल्या नव्या घरात गृहप्रवेश करताना दिसत आहेत. अनेक वर्षे कष्ट करूनही मुलांचे शिक्षण, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. अखेर त्यांचे हे स्वप्न पूर्ण होत असून संपूर्ण कुटुंब आनंदाच्या वातावरणात गृहप्रवेश सोहळा साजरा करताना दिसते. पारंपरिक शृंगारात सजलेले कुटुंब आणि घरावरील 'लक्ष्मी निवास' ही पाटी या आनंदाच्या क्षणाला अधिक खास बनवते.

मात्र, या आनंदाच्या वातावरणातच मोठा धक्कादायक ट्विस्टही पाहायला मिळणार आहे. प्रोमोमध्ये जान्हवीची आजी विश्रांती घेत असताना जयंत तिच्या खोलीत येतो. जान्हवी त्याचे ऐकत नसल्यामुळे आता आजीला या जगातून जावे लागेल, असे म्हणत तो तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो. उशीने तिचा श्वास रोखण्याचा प्रयत्न करत असतानाच जान्हवी तिथे पोहोचते.

जयंतचा हा प्रकार पाहून संतापलेल्या जान्हवीकडून त्याच्या कानशिलात लगावली जाते. "तुझ्या पापाचा घडा भरला आहे, आता तुला सोडणार नाही," असे म्हणत ती जयंतला घराबाहेर ओढत आणते. हा गोंधळ ऐकून घरातील सर्व सदस्य एकत्र येतात आणि जयंतचे खरे रूप सर्वांसमोर येण्याची चिन्हे दिसू लागतात.

मालिकेच्या आधीच्या भागांमध्ये जयंतने जान्हवीवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार केल्याचे दाखवण्यात आले होते. तिच्या आजीलाही संपवण्याचा प्रयत्न त्याने केला होता. सत्य समजल्यानंतर जान्हवीने त्याच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. नंतर काही घटनांमुळे तिची स्मृती गेली, पण लग्नाच्या दिवशी तिला सर्व काही आठवले. त्यानंतर जयंतला त्याच्याच पद्धतीने धडा शिकवण्यासाठी तिने त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. आता जयंतच्या कृत्यांचा पर्दाफाश होणार का? त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळणार का? आणि लक्ष्मी-श्रीनिवास यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात सुखरूप होणार का? याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पार्थ पवार- कायनात दारा यांच्या साखरपुड्याला दिग्गज नेत्यांची उपस्थिती; पाहा खास Photos

Rahul Gandhi: 'पॅलेटगन वापरण्याचे आदेश गृहमंत्र्यांचेच'; राहुल गांधींच्या आरोपामुळे लोकसभेत घमासान

PMC News: विकासकामांच्या पैशांवर नगरसेवकांचा डल्ला? पुणे महापालिकेतील टक्केवारीचं रेटकार्ड उघड

Dark Chocolate : डार्क चॉकलेट खाण्याचे ७ जबरदस्त फायदे! हृदयापासून मेंदूपर्यंत होतील मोठे बदल

Gold Price: देशात सोनं टंचाई? आयात रखडली, किंमती वाढणार? व्यवहारांनाही मोठा ब्रेक

SCROLL FOR NEXT