Rahul Magdum SAAM TV
मनोरंजन बातम्या

Rahul Magdum : 'लागिरं झालं जी' फेम अभिनेत्याने खरेदी केली लग्जरी कार, किंमत वाचून बसेल धक्का

Rahul Magdum New Car Price : 'लागिरं झालं जी' फेम अभिनेत्याने आलिशान कार खरेदी केली आहे. नव्या कारचे फोटो आणि व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहे. त्याच्या लग्जरी कारची किंमत जाणून घेऊयात.

Shreya Maskar

2025 मध्ये अनेक कलाकारांनी आपली स्वप्न पूर्ण केली आहेत. कोणी नवीन घर खरेदी केलं तर कोणी नवीन कार विकत घेतली आहे. तर काहींनी आपल्या नात्याचा खुलासा करून नवीन आयुष्याला सुरूवात केली आहे. अस आता एक मराठमोळ्या अभिनेत्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या संबंधित एक खास पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. 'लागिरं झालं जी' फेम अभिनेता राहुल मगदूमच्या (Rahul Magdum) घरी नवा पाहुणा आला आहे.

'लागिरं झालं जी' या मालिकेमुळे अभिनेता राहुल मगदूमला खूप लोकप्रियता मिळाली आहे. आता हा अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राहुलने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर एक आलिशान कार खरेदी केली आहे. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटो आणि व्हिडीओला त्यांने खास कॅप्शन देखील दिलं आहे.

कॅप्शनमध्ये राहुलने लिहिलं की,"आता पुढचा प्रवास वातानुकूलित सेल्फ गिफ्टेड कारने करावा म्हणतो…काय म्हणता? माझी स्वतःची पहिली कार आणि याचे श्रेय तुम्हा सर्वांना जाते...प्रेम आणि पाठिंब्यासाठी खूप खूप धन्यवाद...मी माझ्या कुटुंबाचा आणि तुमचा कायम कृतज्ञ राहीन. न्यू फॅमिली मेंबर" त्याच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळींकडून कमेंट्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

राहुलच्या कारचे नाव आणि किंमत

राहुलने 'हुंडई आय-20' ही कार खरेदी केली आहे. ज्याची किंमत जवळपास 8.25 लाख रुपये इतकी आहे.

राहुलचे करिअर

आजवर राहुल मगदूम अनेक मालिकांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याची 'लागिरं झालं जी' ही मालिका खूप गाजली. त्यानंतर तो शेलिब्रिटी पॅटर्न, चला हवा येऊ द्या या शोमध्ये दिसला. तसेच त्याने चित्रपटातही काम केले आहे. त्याच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT