Ladki Bahin Movie  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ladki Bahin Movie : 'लाडकी बहीण' मोठ्या पडद्यावर झळकणार, चित्रपटात 'या' कलाकारांची लागली वर्णी

Ladki Bahin Movie Muhurat : 'लाडकी बहीण' चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला आहे. चित्रपटात कोणते कलाकार पाहायला मिळणार,जाणून घेऊयात.

Shreya Maskar

महाराष्ट्र राज्यातील विद्यमान सरकारच्या बऱ्याच योजनांचा लाभ जनतेला मिळत आहे. यांपैकी काही योजना त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेमुळे प्रकाशझोतात राहिल्या आहेत. 'लाडकी बहीण' योजना (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) त्यापैकीच एक आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेत राहिलेली ही योजना आता मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. 'लाडकी बहीण' (Ladki Bahin Movie) असे शीर्षक असलेल्या मराठी चित्रपटाचा नुकताच मुहूर्त करण्यात आला आहे.

निर्मात्या शितल गणेश शिंदे, बाबासाहेब पाटील आणि अनिल वणवे हे 'लाडकी बहीण' या मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. गणेश शिंदे यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार होणार आहे. 'लाडकी बहीण' ची पटकथा-संवादलेखन शितल शिंदे यांनी केले आहे. महाराष्ट्रातील कोट्यवधी माता-भगिनींच्या मदतीला धावून आलेल्या महाराष्ट्र सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेवर आधारित असलेल्या या सिनेमाचा नुकताच मुहूर्त करण्यात आला.

सातारा येथे सांस्कृतिक मंत्री श्री.आशिष शेलार यांनी 'लाडकी बहीण' सिनेमाच्या मुहूर्ताचा क्लॅप दिला. यावेळी कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोशी, सांस्कृतिक विभाग उपाध्यक्ष पंकज चव्हाण, राजेंद्र मोहिते, अनंत काळे, महेश देशपांडे आणि तहसीलदार आदी मंडळी उपस्थित होती.

महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ असंख्य महिलांनी घेतला आहे. गोरगरीब जनतेच्या संसाराला हातभार लावत महाराष्ट्रातील महिला वर्गाचे आर्थिक सबलीकरण करणारी लाडकी बहीण योजना खूप गाजली. एक महत्त्वपूर्ण विषय अतिशय खेळकर पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात येणार असून 'लाडकी बहीण'च्या रुपात परिपूर्ण कौटुंबिक मनोरंजक चित्रपट तयार करण्यात येत असल्याचे दिग्दर्शकांचे म्हणणे आहे.

'लाडकी बहीण' चित्रपटामध्ये मोहन जोशी, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, विजय पाटकर, अनिल नगरकर, सुरेखा कुडची, उषा नाडकर्णी, गौतमी पाटील, प्रिया बेर्डे, रुक्मिणी सुतार, भारत गणेशपुरे, जयवंत वाडकर, सारिका जाधव, जयश्री सोनवले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. गजानन शिंदे या सिनेमाचे छायालेखक असून संगीत विनीत देशपांडे यांचे लाभले आहे. गायक अवधूत गुप्ते तसेच आनंद शिंदे यांच्या आवाजात 'लाडकी बहीण'मधील गाणी संगीतबद्ध करण्यात येणार आहेत. पंकज चव्हाण नृत्य दिग्दर्शक असून प्रशांत कबाडे, शिवाजी सावंत या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hyperloop Rail: देशातील पहिली हायपरलूप रेल्वे कधी धावणार? जाणून घ्या, नव्या रेल्वेचा मार्ग

Ration Card Holder: राज्यातील 3 हजार रेशन कार्डधारकांना नाही मिळणार रेशन; काय आहे कारण?

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं; मनोज जरांगे समर्थकांकडून बीड जिल्हा बंदची हाक, VIDEO

EPFO 3.0 लाँन्च होण्यास का होतोय विलंब? कोणत्या पाच नियमात होतील बदल? जाणून संपूर्ण माहिती

Horrific : दुहेरी हत्याकांडाने खळबळ; घरगुती वादातून जावयाने केली मायलेकीची हत्या

SCROLL FOR NEXT