''ना ये भौंकते हैं, ना ग़ुर्राते हैं…'' अर्जुन कपूरच्या आगामी चित्रपट 'कुत्ते' ची घोषणा  INSTAGRAM/@arjunkapoor
मनोरंजन बातम्या

''ना ये भौंकते हैं, ना ग़ुर्राते हैं…'' अर्जुन कपूरच्या आगामी चित्रपट 'कुत्ते' ची घोषणा

''ना ये भौंकते हैं, ना ग़ुर्राते हैं… बस काटते हैं! Presenting #KUTTEY!'' असं कॅप्शन त्याने पोस्टला दिलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवुड अभिनेता अर्जुन कपूरने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचं शीर्षक ''कुत्ते'' असं आहे. याची माहिती त्यानं इंस्टाग्रामवरुन दिली आहे. आपल्या इंस्टाग्रानवर त्याने व्हिडीओ पोस्टर शेयर केलं आहे. या पोस्टरमध्ये सात व्यक्ती दिसत असून त्यांना कुत्र्यांचे चेहरे लावण्यात आले आहेत. ''ना ये भौंकते हैं, ना ग़ुर्राते हैं… बस काटते हैं! Presenting #KUTTEY!'' असं कॅप्शन त्याने पोस्टला दिलं आहे. (kuttey a upcoming film of arjun kapoor)

हे देखील पहा -

या चित्रपटात अर्जुन कपूरसह कोंकणा सेन शर्मा, नसिरुद्दीन शहा, कुमुद मिश्रा, राधिका मदान, शार्दुल भारद्वाज आणि तब्बू यांसारखे दिग्गज मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. विशाल भारद्वाज आणि लव्ह रंजन हे या सिनेमाचे निर्माते असून आसमान भारद्वाज या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. या सिनेमाचे प्री-प्रोडक्शनचे काम सुरु असून याच वर्षाच्या अखेरीस सिनेमातचे शुटींग पुर्ण हाेणार आहेे. पोस्टरच्या फर्स्ट लुकवरुन तरी हा सिनेमी कॉमेडी असल्याचं वाटतंय. मात्र अद्यापतरी याबाबत अधिक माहिती दिलेली नाही.

अर्जुन कपूरने २०१२ साली इश्कजादे या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर इंट्री केली होती. त्यानंतर औरंगजेब, गुंडे, टू स्टेट्स, फाइंडिग फनी, तेवर, की अॅन्ड का, हाल्फ गर्लफ्रेंड, मुबारकॉं, भावेश जोशी सुपरहीरो, नमस्ते इंग्लंड, झीरो, इंडीयाज् मोस्ट वॉन्टेड, पानिपत अशा सिनेमांधून तो बॉलिवुडमध्ये झळकला आहे. याशिवाय २०१४ साली गुंडे चित्रपटातील भुमिकेसाठी त्याला मोस्ट एंटरटेनिंग अॅक्टर इन अॅक्शन फिल्म हा अवॉर्ड मिळाला आहे. तसेच त्याच्या भूत पोलिस या चित्रपटाच ट्रेलर रिलीज झालं असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT