Kush Shah's Exit from TMKOC Show Saam Tv
मनोरंजन बातम्या

Taarak Mehta's Goli Quit Show : टप्पू गँगमधील आणखी एका कलाकाराने सोडला शो, गेल्या १६ वर्षांपासून साकारतोय महत्त्वाची भूमिका

Kush Shah's Exit from TV Show : टीव्ही अभिनेता कुश शाह अर्थात 'तारक मेहता का उल्टा चश्मा'या लोकप्रिय मालिकेतील गोलीच्या भूमिकेतून तो घराघरात पोहचला. या मालिकेतून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली.

Chetan Bodke

कांचन सोनावणे, साम टीव्ही, मुंबई

टीव्ही अभिनेता कुश शाह (Kush Shah) अर्थात 'तारक मेहता का उल्टा चश्मा'(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय मालिकेतील गोलीच्या भूमिकेतून तो घराघरात पोहचला. या मालिकेतून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. कुश शाह गेल्या १६ वर्षांपासून या मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांचे निखळ मनोरंजन करीत आहे. अभिनेत्याविषयी मालिकेबद्दल महत्वाची बातमी समोर आली आहे. नुकताच त्याने मालिका सोडली आहे. निर्मात्यांसोबतच कुश शाहनेही शो सोडण्याविषयीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे.

काही दिवसांपूर्वीच कुश शाहने शो सोडल्याचे वृत्त समोर आले होते. पण ती चर्चा होती. अखेर कुश शाहने मालिका अधिकृत रित्या सोडली आहे. नुकतंच निर्मात्यांनी आणि स्वत: कुश शाहने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केलेला आहे. मालिकेमधून सर्व कलाकारांनी आणि निर्मात्यांनी कुश शाहला फेअरवेलही दिला. त्यासोबतच मालिकेमध्ये नवीन गोली कोण दिसणार याचीही झलक दाखवली आहे. मालिकेतील आजवर अनेक कलाकारांनी मालिकेला सोडचिठ्ठी दिलेली आहे. त्या यादीमध्ये, आता कुश शाहच्या नावाचाही समावेश झाला.

गेल्या १६ वर्षांपासून कुश शाह या मालिकेमध्ये गोलीचे पात्र साकारत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केले आहे. कुश बालपणापासूनच या मालिकेमध्ये दिसत आहे. पण आता त्याने ही मालिका सोडली असून कुशच्या जागी नव्या कलाकाराची एन्ट्री झाली आहे. मेकर्सने कुशच्या फेअरवेलचा व्हिडिओ शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओत मालिकेतील सहकलाकार, निर्माते असित मोदी आणि गोकुळधाम सोसायटीतील अनेक सदस्य उपस्थित होते. फेअरवेलच्या वेळी कुशने मालिकेतील कलाकारांसह चाहत्यांचेही आभार मानले आहेत.

'तारक मेहता का उल्टा चश्मा' गेल्या १६ वर्षांपासून चाहत्यांचे निखळ मनोरंजन करीत आहेत. सर्वाधिक मालिका चालणाऱ्या यादीमध्ये या मालिकेचा समावेश झालेला आहे. दिशा वकानी, भव्य गांधी, गुरुचरण सिंह, शैलेश लोढा, नेहा मेहता आणि जेनिफर मिस्त्री यांनी मालिका सोडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

SCROLL FOR NEXT