Monalisa SAAM TV
मनोरंजन बातम्या

Monalisa : 'व्हायरल गर्ल' मोनालिसाचा नवरा जेलमध्ये जाणार? पोलिसांत गुन्हा दाखल, अचानक नेमकं काय घडलं?

Monalisa Bhosle Minor Marriage Under Age : NCST च्या तपासात मोनालिसा भोसले अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. फरमान खानसोबत लग्न करताना ती १८ वर्षांपेक्षा कमी होती.

Shreya Maskar

महाकुंभ मेळ्यामुळे प्रसिद्ध झालेली मोनालिसाने महाराष्ट्रीयन मुस्लिम बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली.

मोनालिसाच्या नवऱ्याविरोधात FIR दाखल करण्यात आले आहे.

मोनालिसा अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.

2025 मध्ये उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा आयोजित करण्यात आला होता. या महाकुंभ मेळ्यात मोनालिसाने (Monalisa Bhosle) आपल्या डोळ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कुंभमेळ्यात मोनालिसा रूद्राक्ष माळा विकायची. त्यानंतर मोनालिसा कायम चर्चेत राहिली. 11 मार्चला मोनालिसा भोसलेने महाराष्ट्रीयन मुस्लीम बॉयफ्रेंड फरमान खानसोबत पळून जाऊन लग्न केले आहे. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मोनालिसाने कुटुंबाच्या विरोधात जाऊन फरमानशी लग्न केले. मोनालिसाने आंतरधर्मीय लग्न केले आहे. ज्यामुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आहे.

मोनालिसा प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या (NCST) चौकशीत मोनालिसाला अल्पवयीन असल्याचे घोषित करण्यात आले आहे. केरळमध्ये फरमान खानसोबत झालेल्या तिच्या लग्नाच्या वेळी ती १८ वर्षांपेक्षा कमी वयाची होती, असा दावा करण्यात आला आहे. प्रकरणानुसार, वकील प्रथम दुबे यांनी १७ मार्च २०२६ रोजी आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर, आयोगाच्या निर्देशानुसार स्थापन केलेल्या तपास पथकाने केरळपासून महेश्वरपर्यंत कागदपत्रे आणि तथ्यांची तपासणी केली.

तपासादरम्यान, महेश्वर सामुदायिक आरोग्य केंद्राच्या नोंदींमध्ये मुलीची जन्मतारीख ३० डिसेंबर २००९ अशी दाखवण्यात आली. या आधारावर, ११ मार्च २०२६ रोजी तिच्या लग्नाच्या वेळी तिचे वय अंदाजे १६ वर्षे असल्याचे नमूद करण्यात आले होते. तपासात असेही उघड झाले की, केरळमध्ये विवाह नोंदणीसाठी वापरलेल्या जन्म प्रमाणपत्रावर वेगळीच जन्मतारीख होती. तपास पथकाने हे संशयास्पद असल्याचे म्हटले आणि संबंधित कागदपत्रांच्या आधारे ते प्रमाणपत्र रद्द करण्याचे निर्देश दिले.

मोनालिसाशी लग्न केलेल्या फरमान खानला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरगोन जिल्ह्यातील महेश्वर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.खोट्या जन्म प्रमाणपत्रावर मोनालिसाची जन्मतारीख १/१/२००८ अशी लिहिली होती.मोनालिसाच्या पालकांनी आयोगाला त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांची जात प्रमाणपत्रे देखील सादर केली, ज्यामुळे मोनालिसाचे पालक अनुसूचित जमाती समुदायाचे असल्याचे आणखीनच निश्चित झाले.

आयोगाच्या शिफारशीनुसार, मध्य प्रदेशातील महेश्वर पोलीस ठाण्यात अपहरणासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अल्पवयीन मुलीच्या विवाहाबाबत आणि या घटनेत सामील असलेल्या राजकीय, मूलतत्त्ववादी संघटनांच्या भूमिकेबाबतचा सविस्तर अहवाल केंद्र सरकारला पाठवला जात आहे. आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आर्थिक संबंधांपलीकडे मानवी मूल्ये, सांस्कृतिक वारसा आणि परस्पर संवाद आवश्यक- CM फडणवीस

Styling Tips: महागडे कपडे न घालताही दिसाल एकदम क्लासी! लूकला चारचाँद लावतील 'हे' ७ स्टाइलिंग टिप्स

Dangerous Fort : १ चुकीचं पाऊल अन् थेट २,२५० फूट खोल दरीत, सूर्य मावळल्यानंतर 'या' किल्ल्याजवळ कुणी फिरकत नाही

Maharashtra News Live Update: सोलापुरात भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला

Snake Bite: सापाचे विष किती प्रकारचे असते, शरीरावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT