Monalisa  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Monalisa : "मला १० वेळा स्पर्श केला"; 'व्हायरल गर्ल' मोनालिसाचा दिग्दर्शकावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल

Monalisa Files Complaint Director : कुंभमेळ्यातून व्हायरल झालेल्या मोनालिसाने दिग्दर्शकाविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

अलिकडेच मोनालिसाने मुस्लिम बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली.

मोनालिसाने चित्रपट दिग्दर्शकाविरुद्ध तक्रार दाखल केली.

कुंभमेळा गर्ल वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे.

कुंभमेळा गर्ल लग्न झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चांगलीच चर्चेत आहे. 2025 मध्ये उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा आयोजित करण्यात आला होता. या महाकुंभ मेळ्यात मोनालिसाने (Monalisa Bhosle) आपल्या डोळ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कुंभमेळ्यात मोनालिसा रूद्राक्ष माळा विकायची. 11 मार्चला मोनालिसा भोसलेने महाराष्ट्रीयन मुस्लीम बॉयफ्रेंड फरमान खानसोबत पळून जाऊन लग्न केले आहे. आता मोनालिसाने आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

TOIच्या वृत्तानुसार, मोनालिसाने केलेल्या तक्रारीनंतर एर्नाकुलम सेंट्रल पोलिसांनी एका चित्रपट दिग्दर्शकाविरुद्ध 'पॉक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी अल्पवयीन असताना आरोपीने तिच्याशी गैरवर्तन केले होते, असा आरोप तिने केला आहे. कुंभमेळ्यातील व्हिडिओमुळे प्रसिद्धी मिळाल्यानंतर, अभिनयाच्या संधी देण्याच्या बहाण्याने दिग्दर्शकाने तिचे शोषण केले, असा आरोपही तिने केला आहे.

एका अधिकाऱ्याने दिग्दर्शकाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला; मात्र, या प्रकरणाबाबत अधिक तपशील देण्यास त्यांनी नकार दिला. तसेच, ही घटना केरळ राज्याबाहेर घडली असल्याचेही सांगण्यात आले आहे. या तरुणीने एका दंडाधिकाऱ्यासमोर आपला गोपनीय जबाबही नोंदवला असल्याचे समजते.

यापूर्वी कोची येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत, संबंधित तरुणीने असा आरोप केला होता की, दिग्दर्शकाने तिला "१० वेळा" अयोग्यरित्या स्पर्श केला होता. "जेव्हा मी माझ्या कुटुंबाला या घटनेबद्दल सांगितले, तेव्हा त्यांनी मला पाठिंबा दिला नाही," असेही तिने त्यावेळी म्हटले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rain: पहिल्याच पावसात पुणे तुंबले! वाघोलीतील रस्त्यांवर गुडघाभर पाणी; वाहनं पाण्यात अडकली; पाहा VIDEO

Heart Attack in Gym: जीममध्ये व्यायाम करताना ही ५ लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे

ठाणे शहरात १० टक्के पाणी कपात; मुंबई महापालिकेने घेतला निर्णय

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

पेट्रोलसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको; कॅन घेऊन रस्त्यावरच मांडला ठिय्या, VIDEO

SCROLL FOR NEXT