Famous Actress Wedding saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actress Wedding : टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत अडकली विवाह बंधनात, लग्नाचे रोमँटिक फोटो व्हायरल

Kritika Kamra-Gaurav Kapur Wedding : टिव्ही अभिनेत्री कृतिका कामरा आणि अभिनेता गौरव कपूर नुकतेच लग्न बंधनात अडकले. त्यांच्या लग्न सोहळ्याचे सुंदर फोटो व्हायरल झाले आहेत.

Shreya Maskar

कृतिका कामरा आणि गौरव कपूर खूप वेळापासून एकमेकांना डेट करत होते.

नुकतेच कृतिका आणि गौरव लग्न बंधनात अडकले आहेत.

कृतिका-गौरवने रजिस्टर मॅरेज केले.

टिव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री कृतिका कामरा नुकतीच लग्न (Kritika Kamra-Gaurav Kapur Wedding) बंधानात अडकली आहे. लग्न सोहळ्याचे खास फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. कृतिका कामरा खूप वेळापासून अभिनेता आणि क्रिकेट होस्ट गौरव कपूरला डेट करत होती. दोघेही अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. कृतिका आणि गौरवचे लग्न मुंबईत झाले. या लग्न सोहळ्याला जवळचे मित्रमंडळी, कुटुंब हजर होते.

कृतिका कामरा आणि गौरव कपूरने लग्न सोहळ्याला सुंदर वेस्टन लूक केला होता. कृतिका कामराने लग्नाला लाल रंगाची सिल्क साडी नेसली होती. स्लीव्हलेस ब्लाउजसह तिने स्टायलिश लूक केला होता. सिल्व्हर ज्वेलरी, ग्लॉसी मेकअप, मोकळे केस ठेवून तिने हा लूक पूर्ण केला आहे. कृतिकाच्या या स्टायलिश लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कृतिका-गौरव एकत्र खूपच छान दिसत होते. गौरवने लग्न सोहळ्यासाठी गोल्डन सूट परिधान केला होता. तो खूपच हँडसम दिसत होता.

लग्नानंतर कृतिका कामरा आणि गौरव कपूरने मिडिया समोर खास पोज दिल्या. दोघांनी हात जोडून सर्वांचे आभार मानले. दोघे खूप आनंदी दिसत होते. दोघांनी लग्नाची मिठाई देखील वाटली. दोघांचे लग्नातील रोमँटिक फोटो व्हायरल होत आहेत. कृतिका कामरा आणि गौरव कपूरने बुधवारी (11 मार्च) ला रजिस्टर मॅरेज केले. कृतिका आणि गौरव 12 मार्चला 'द पार्टी, आफ्टर' (The Party, After) सेलिब्रेशन करणार आहेत. ही त्यांच्या लग्नाची पार्टी असणार आहे. याला अनेक कलाकार पाहायला मिळतील.

गौरव कपूरचे हे दुसरे लग्न आहे. कृतिका कामरा आधी गौरव कपूर किरत भट्टसोबत 2014 ला लग्नगाठ बांधली आणि 2021 ला त्यांचा घटस्फोट झाला.कृतिका कामरा नुकतीच 'द ग्रेट शमसुद्दीन' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. कृतिका कामराने आजवर अनेक मालिका, शो, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. सध्या कलाकार, चाहते आणि कुटुंब यांच्याकडून प्रेमाचा, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आजपासून सुरुवात

Buldhana Accident: बोलेरोची दुचाकीला भयंकर धडक, बापाच्या डोळ्यासमोर मुलाचा मृत्यू, बायकोने प्राण सोडले; बुलढाण्यात हळहळ

Rain Update : महाराष्ट्रात पावसाचा लपंडाव! नागपूरसह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री दरोडा, धावत्या कारचे टायर फोडून कुटुंबाला लुटले; सोन्या-चांदीचे दागिने लंपास

भाजप नेत्याला उडवण्याचा प्रयत्न, आमदाराच्या घरावर ग्रेनेड फेकले, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT