Kriti Sanon Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅननचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ती तिच्या कुटुंबासह विमानतळावर होती. तिची बहीण नुपूर सॅननचं लग्न उदयपूरमध्ये झाल्यानंतर तिथून सर्वजण घरी परतत आहेत. क्रिती आणि तिचा बॉयफ्रेंड कबीर बहिया एकत्र उभे होते. तेव्हा क्रितीने त्यांचा व्हिडिओ काढणाऱ्या पापाराझींना पाहिले. त्यामुळे ती त्यांच्यावर संतापली आणि त्यांना थांबण्यास सांगितले. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
अभिनेत्रीला राग अनावर
क्रिती सॅननची बहीण नुपूर सॅननने उदयपूरमध्ये गायक स्टेबिन बेनशी मोठ्या थाटामाटात लग्न केले. या भव्य लग्न समारंभाला कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. मौनी रॉय आणि दिशा पटानी देखील या लग्नाला हजेरी लावली. क्रितीचा बॉयफ्रेंड कबीर बहिया देखील लग्नात होता. लग्नानंतर, क्रितीचे कुटुंब विमानतळावर दिसले, जिथे कृती आणि कबीर एकत्र होते. पापाराझींनी त्यांना कॅमेऱ्यात कैद करायला सुरुवात केली. पण नंतर अभिनेत्रीने त्यांना पाहिले आणि ती संतापली.
कबीर बहिया कोण आहे?
कबीर बहिया हा एक ब्रिटिश उद्योजक आहे. त्याने इंग्लंडमध्येच त्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. तो वर्ल्डवाइड एव्हिएशन अँड टुरिझम लिमिटेडचा संस्थापक देखील आहे. त्याचे वडील कुलजिंदर बहिया हे युके-स्थित ट्रॅव्हल एजन्सी साउथहॉल ट्रॅव्हलचे मालक आहेत. कबीरचे क्रिकेटपटू एमएस धोनीसोबतही खास संबंध आहेत.
नुपूर सॅननचे लग्न
क्रितीची बहीण नुपूर सॅननने भारतीय गायक आणि कलाकार स्टेबिन बेनशी ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने लग्न केले. तिने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. दोघे काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.