Box Office Collection: प्रभासचा 'द राजा साब' आणि रणवीर सिंग'धुरंधर' आमने-सामने; कोणी केली सर्वात जास्त कमाई

Box Office Collection: प्रभासच्या 'द राजा साब' चित्रपटाने तिसऱ्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये सर्वात कमी कमाई केली आहे. दरम्यान, रणवीर सिंगच्या 'धुरंधर' चित्रपटाच्या कमाईत आठवड्याच्या शेवटी वाढ झाली आहे.
Box Office Collection
Box Office CollectionSaam Tv
Published On

Box Office Collection: साऊथचा सुपरस्टार प्रभासचा 'द राजा साब' हा चित्रपट चित्रपटगृहात येण्यापूर्वी बरीच उत्सुकता होती. प्रभासची लोकप्रियता पाहता, चित्रपटाच्या पहिल्या दिवशी चांगली कमाई झाली. पण, दुसऱ्या दिवसापासूनच चित्रपटाच्या कमाईत सातत्याने घट होत आहे, यावरून असे दिसून येते की प्रभासच्या आदिपुरुष प्रमाणे हा चित्रपटही फ्लॉप होऊ शकतो. रविवारी नेहमीच चित्रपटाच्या कमाईत वाढ होण्याची अपेक्षा होती, परंतु रविवारी देखील हा चित्रपट खास चालला नाही.

'द राजा साब'च्या तिसऱ्या दिवसाचं कलेक्शन

रविवारी, प्रभासच्या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या तुलनेत त्याच्या कमाईत 62% घट दिसून आली. सध्या, भारतात त्याची एकूण कमाई अंदाजे 109.2 कोटींवर पोहोचली आहे. सोनिकच्या आकडेवारीनुसार, 'द राजा साब'ने तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार, ११ जानेवारी रोजी २०.१२ कोटी रुपये कमावले. मागील दिवसाच्या २६ कोटी रुपयांच्या कमाईपेक्षा हे खूपच कमी आहे. रविवारी चित्रपटाचा ऑक्युपन्सी रेट फक्त ३९.४% होता.

Box Office Collection
Sohail Khan: सलमानच्या भावाने हेल्मेट न घालता चालवली बाईक; VIDEO शुट करताच घातली शिवी, आता मागितली माफी

'द राजा साब'चे बजेट किती आहे?

'द राजा साब'चे बजेट ३०० कोटी आहे. चित्रपटाने फक्त तीन दिवसांत बजेटची ३६% रक्कमच वसूल केली आहे. चित्रपट हिट होण्यासाठी एकूण या चित्रपटाला ६०० कोटी रुपये कमवले आहेत. परंतु सध्याची गती पाहता, हा चित्रपट अधिक काळ थिएटरमध्ये असणे कठीण आहे.

Box Office Collection
The 50 Contestants: किम शर्मापासून धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलपर्यंत; कोण-कोण असणार 'द 50'मध्ये? वाचा यादी

रणवीर सिंगच्या 'धुरंधर' चित्रपटाने ३८ दिवसांत किती कमाई केली?

रणवीर सिंगचा 'धुरंधर' चित्रपट गेल्या ३८ दिवसांपासून थिएटरमध्ये चांगला व्यवसाय करत आहे. या चित्रपटाची पाचव्या सोमवारपासून कमाई थोडी कमी झाली असली तरी, 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' आणि 'एकिस' सारख्या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटांपेक्षा चांगला व्यवसाय करत आहे. ३८ व्या दिवशी (सहावा रविवार) देखील चांगली कमाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com