'बिग बॉस मराठी' प्रेक्षकांच्या घरोघरी पोहोचलेली 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या पोस्टनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अलिकडेच अंकिताने कुणाल भगतसोबत लग्नगाठ बांधली आहे. आज अंकिताच्या डार्लिंग नवऱ्याचा कुणालचा ( Kunal Bhagat Birthday ) वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त झापुक झुपूक स्टाइल अंकिताने नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहे.
"प्रिय कुणाल
आज तुझा वाढदिवस...आपण दोघेही सेलिब्रेशनच्या बाबतीत तसे अरसिक आहोत पण आजचा दिवस तुझ्यापेक्षा जास्त माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी एका घरात एक "मुन्ना" जन्माला आला आणि त्याने २ महिन्यापूर्वी एका वाट चुकलेल्या सैरभैर मुलीला तिच्या आयुष्यात स्थिरता मिळवून दिली. अंकिता अशी वागते हे जगाला दिसायचं पण ती का वागते ते तु शोधलस...तुझ्या असण्याने मला कामाची अजून ऊर्जा मिळत राहते...का जगाव ह्यापेक्षा आयुष्य किती येक नंबर आहे हे तु दाखवलंस... "
"तुझ्या म्हणण्याप्रमाणे वाढदिवस म्हणजे आपण मागच वर्ष किती भारी जगलो ह्याच celebration असल पाहिजे...मागच्या वाढदिवसाला लग्नासाठी नाही म्हणणारी मी ह्या वाढदिवसाला तुझी बायको आहे अजुन भारी काय असू शकत!!!!! मी हे म्हणणार नाही की देव तुझ्या सगळ्या इच्छा पुर्ण करो...मी हे म्हणेन की स्वामी मला एवढी ताकद देवोत की मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन...तुला जन्मदिवसाच्या झापुक झुपूक शुभेच्छा!!!खुप काम कर, खुप मोठा हो...मी काय स्टुडिओत चटई टाकुन झोपेन...
No late night work this year
Happy Birthday darling Navrya..."
अंकिता वालावलकर ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तसेच ती एक व्यवसायिका देखील आहे. तिने आपल्या स्टाइलने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. ती सोशल मिडिया खूप सक्रिय असते. अंकिताच्या या पोस्टवर चाहत्यांनी, तिच्या मित्रमैत्रिणींनी कमेंट्स आणि शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे. अंकिताचा नवरा कुणाल भगत लोकप्रिय संगीतकार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.