Ankita And Suraj Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankita And Suraj: 'माझ्याकडून अपेक्षा....' अंकिता अन् सूरजमध्ये वाद? ते फोटो कोणी केले डिलिट?

Ankita Walawalkar And Suraj Chavan: सूरजच्या इन्स्टावरून अंकिता आणि सूरजच्या भेटीचे व्हिडीओ दिसत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीचा यंदाचा शो स्पर्धकांची खेळी, त्यांच्यातील नात्यांच्या चर्चा, गाणी, डान्स यामुळे चांगलाच गाजला. बिग बॉसच्या सीझन 5 ने सर्वच रेकॉर्ड्स मोडले होते. बारामतीचा रिलस्टार सूरज चव्हाण बिग बॉसचा विजेता ठरला. बिग बॉस संपल्यानंतर देखील या भेटी गाठी होत राहिल्या. सोशल मीडियावर सूरजच्या भेटीदरम्यानचे फोटो व्हायरल झाले होते.

बिग बॉस विजेता सूरज चव्हाण इन्स्टाग्रामवरील फोटोंमुळे चर्चेत आला आहे. विविध रिल्स आणि व्हिडीओच्या माध्यमातून तो चाहत्यांशी संपर्कात असतो. राजकीय तसेच सेलिब्रिटी मंडळीनी बिग बॉस विजेता सूरज चव्हाणची भेट घेतली. नुकतंच कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने सूरज चव्हाणच्या बारामतीतील मोढवे गावी त्याची भेट घेतली. सोशल मीडियावर अंकिताने हे फोटो देखील शेअर केले होते. मात्र अचानक सूरजच्या इन्स्टावरून अंकिता आणि सूरजच्या भेटीचे व्हिडीओ दिसत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

अंकिता वालावलकर ही होणारा पती कुणाल भगतसोबत सूरज चव्हाणच्या घरी गेली. अंकिताने संपूर्ण सूरजच्या परिवाराची भेट घेतली. सूरजच्या घरी अंकिताने जेवण देखील केले. या दोघांच्या भेटीचे फोटो अंकीताने शेअर केले होते. यामध्ये तिने सूरजला देखील टॅग केले होते. मात्र अचानक सूरजच्या अकाऊंटवरून अंकिताची पोस्ट दिसत नसल्याचे समोर आले आहे.

सूरजच्या अकाऊंटवरून रिमुव्ह करण्यात आलीय, अशी कमेंट अंकिताच्या पोस्टवर तिच्या चाहत्याने केली. यावर अंकितानेही प्रतिक्रिया दिली आहे. थँक यू, तुम्ही ही गोष्ट लक्षात आणून दिली. पण एक शेवटचं सांगते सूरज त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट हँडल करत नाही. सूरजच्या आजूबाजूला त्यांना मी नको असल्या कारणास्तव मी ह्यातून काढता पाय घेत आहे. यापुढे माझ्याकडून अपेक्षा नसाव्यात, धन्यवाद, असं अंकिता म्हणाली आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात असताना चांगले मित्र असणारे अंकिता आणि सूरज यांच्यामध्ये नेमकं काय झालं आहे असा प्रश्न पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

निवडणुकीचं बिगुल वाजलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची पहिली यादी जाहीर, प्रसिद्ध गायकाला मिळाली उमेदवारी

SCROLL FOR NEXT