Ankita Walawalkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankita Walawalkar: गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अंकिता वालावलकरने चाहत्यांना दिली गुड न्यूज; नवऱ्यासोबत शेअर केला खास फोटो

Ankita Walawalkar's Buy New Home: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरने पनवेलमध्ये नवं घर खरेदी केलं. तिच्या भावुक पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधले असून तिचा प्रवास प्रेरणादायी ठरतो.

Shruti Vilas Kadam

jAnkita Walawalka: ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अंकिताने पनवेलमध्ये स्वतःचे नवे घर खरेदी केल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. या नव्या घराचे फोटो आणि अनुभव तिने सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.

अंकिता आणि तिचा पती कुणाल यांनी मिळून हे घर घेतले असून, या घरात सुंदर बाल्कनी आणि आकर्षक इंटीरियर असल्याचे फोटोमधून दिसून येते. या खास क्षणाचे सेलिब्रेशन करत दोघांनीही घरात फोटोशूट केले आहे.

नवीन घराबद्दल बोलताना अंकिताने तिच्या प्रवासाची आठवण करून दिली. “घर घेणं हे फक्त स्वप्न नव्हतं, ती माझी जिद्द होती,” घर घेणं… हे फक्त स्वप्न नव्हतं, ती माझी जिद्द होती.
मुंबईत आले तेव्हा सिव्हिल इंजिनियर म्हणून इतरांची घरं बांधत होते…पण मनात एकच विचार “माझं घर कधी?”मी कुठेतरी वाचलं होतं स्वप्नं नेहमी आपल्या लायकीपेक्षा मोठी बघायची.कारण लायकी आपण वाढवू शकतो. पण छोटं स्वप्न मोठं होत नाही.मला फॉलो करणाऱ्यांना माहिती असेल.मी कित्येकदा पेडर रोडवरून फेऱ्या मारायचे.अंबानींच्या antilia समोर उभी राहायचे.त्या उंच इमारतीकडे बघायचे,आणि स्टोरी टाकायचे “एक दिन मेरा भी घर होगा.

तिने पुढे खास आठवण शेअर करत सांगितले की, ”लोकांसाठी ती फक्त एक स्टोरी होती…पण माझ्यासाठी ती प्रार्थना होती.विश्वाला केलेली एक शांत हाक होती.आज विचार केला तर अंगावर शहारे येतात. आणि योगायोग बघा आज ज्या टॉवरमध्ये आमचं घर आहे,त्या टॉवरचं नाव आहे “Antilia” हा योगायोग आहे? की स्वामींची इच्छा? मी जिथे नोकरी करायचे तिथले आमचे काँट्रॅक्टर पटेल गुजरातीमध्ये म्हणायचे, “Rotla male easy chhe, pan Mumbai ma ghar male mushkil chhe.”रोटी कमवणं सोपं आहे…पण मुंबईत स्वतःचं घर? खूप अवघड. त्या वाक्याने पण मी कधी घाबरले नाही…उलट ठरवलं होत एक दिवस मीच माझ्या घराच्या चाव्या हातात घेणार! लग्नानंतर हे “माझं” स्वप्न “आमचं” झालं. कारण आता घर फक्त चार भिंती नव्हत्या,ते आमचं future होतं… आमची सुरक्षितता होती.वर्षभर आम्ही घरांच्या शोधात भटकलो.प्रत्येक घरात गेलो पण मन म्हणायचं “नाही… अजून नाही.”एक वेळ अशी आली,की स्वप्न थोडंसं शांत झालं. “कदाचित अजून वेळ आहे” असं आम्ही स्वतःलाच समजावलं.आणि मग…अचानक हे घर समोर आलं.दरवाजा उघडला…आणि मन म्हणालं “हेच!” पण आकडेमोड तयार नव्हती. मन धजावत नव्हतं. भविष्याचं ओझं जड वाटत होतं.

अंकिताने तिच्या पोस्टमध्ये घर खरेदीचा प्रवास सोपा नव्हता, याचाही उल्लेख केला. मी कुणालचा हात पकडला…आणि हसत म्हटलं “उडी मारली की पोहायला येतंच.” त्यादिवशी रात्रभर आम्हाला झोप लागली नाही ,खूप भीती वाटत होती…कुणाल ला तर खूप जास्त भीती वाटत होती…पण मला स्वप्नावर विश्वास होता.आणि त्या दिवशी आम्ही निर्णय घेतला भीतीपेक्षा मोठं आपलं स्वप्न आहे. Risk घ्यायची हिंमत असेल,तरच मोठं स्वप्न पूर्ण होतं. आज या चाव्या हातात आहेत…आणि मनात एकच भावना या पृथ्वीवर आमची स्वतःची एक जागा आहे.छोटी असेल… पण आमची आहे.आणि ती आम्ही दोघांनी उभी केली आहे.अभिमान पैशांचा नाही.अभिमान आहे त्या प्रवासाचा.जर तुम्हीही घराचं स्वप्न पाहत असाल तर लोक काय म्हणतात ते विसरा.उशीर झाला तरी चालेल पण जिद्द जिवंत ठेवा. कारण घर जिद्दीने बांधलं जातं त्या दिवशी मी Antilia कडे बघत होते. आज माझ्या Antilia मध्ये उभी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गुढीपाडव्याच्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचा दर

Satara : गर्भपातानंतर बाळ जिवंत जन्मलं, १२ तास उपाशी ठेवल्यानं मृत्यूचा आरोप; मातेसह कुटुंबीयांची हायकोर्टात याचिका

Maharashtra Live News Update: प्रोटोकॉल मुद्द्यावर उपमहापौर संजय घाडी नाराज; पदाचा सन्मान राखण्याची प्रशासनाला करून दिली आठवण

Tumbbadchi Manjula: हे डोळे कुणाचे..? गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'तुंबाडची मंजुळा'

Amravati Summer Tourism: अमरावतीजवळची 'ही' सुंदर 8 ठिकाणे फिरण्यासाठी ठरतील बेस्ट, निसर्गसौंदर्य पाहून मन होईल प्रसन्न

SCROLL FOR NEXT