Karan Johar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Karan Johar: करणच्या चित्रपटात स्टारकिड्स दिसणार नाहीत; 'या' कारणामुळे घेतला खास निर्णय...

बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चित चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहरवर नेहमीच घराणेशाहीचा आरोप करण्यात येतो. करणच्या बऱ्याच चित्रपटातून स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये डेब्यु करतात.

Chetan Bodke

Karan Johar: बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चित चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहरवर नेहमीच घराणेशाही (Nepotism)चा आरोप करण्यात येतो. करणच्या बऱ्याच चित्रपटातून स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये डेब्यु करतात. करण जोहर पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याच्यावर होत असलेला घराणेशाहीचा आरोप.

नुकताच करणने त्याच्या चित्रपटाबद्दल काही नवा निर्णय घेतला आहे. त्याच्या या नव्या निर्णयाने स्टारकिड्सला फार मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर त्याने हा निर्णय खरंच आमलात आणला तर बॉलिवूडसाठी फारच हा चर्चेचा विषय ठरेल. शेवटी, करण जोहरने असा निर्णय घेण्यामागचे मुख्य कारण काय, चला जाणून घेऊया...

चित्रपट निर्माता- दिग्दर्शक करण जोहर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. अलीकडे, करण जोहर, अनुराग कश्यप, श्रीनिधी शेट्टी, दुल्कर सलमान आणि बर्‍याच मोठ्या चित्रपट निर्मात्यांसोबत तो चर्चेत सामील झाला होता.

या चर्चेत बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या बजेटवर चर्चा करण्यात आली. त्यादरम्यान करण जोहरने बजेटबद्दल सांगितले की, सध्या जर त्याने चित्रपटसृष्टीत नवीन चेहरे लाँच जर केले तर प्रेक्षकांना चित्रपट पाहायला आवडणार नाहीत. चित्रपट निर्माता करणनेही यासाठी अनेक कारणे दिली आहेत.

यावेळी करण जोहरने बॉलिवूड चित्रपटांच्या वाढत्या मार्केटिंग बजेटचीही खिल्ली उडवत सांगितले की, आज जर त्याने कोणत्याही स्टारकिड्सला लॉन्च केले तर कोणीही चित्रपट पाहायला येणार नाहीत. यावेळी चर्चेत करणने बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांच्या बजेटवरही अनेक निर्मात्यांशी चर्चा केली. ज्यावर नि अनुराग कश्यप म्हणाले की, प्रादेशिक चित्रपटांचे बजेट बॉलिवूड चित्रपटांपेक्षा कमी आहे. यावर करणनेही सहमती दर्शवली.

चित्रपट निर्माता करण जोहरकडे वेगळा मार्केटिंग खर्च नसल्याने सध्या तरी तो नवीन स्टारकिड्सला लॉंच करणार नाही. नवीन कलाकारांना लॉन्च केल्यानंतर त्या चित्रपटाचे प्रमोशनचा खर्च वाढतो त्यामुळे तो स्टारकिड्सला लॉंच न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT