Mahesh Manjrekar: महेश मांजरेकरांना आश्रमशाळेच्या संस्थाचालकाच्या विरोधातील वक्तव्य भोवणार?

मांजरेकरांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून कोर्टाने पोलीसांना त्यांच्या विरोधात चौकशीचे ही आदेश दिले आहेत.
Mahesh Manjarekar
Mahesh ManjarekarSaam Tv

Mahesh Manjrekar: मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक आणि कलाकार महेश मांजरेकर एका प्रकरणात अडचणीत सापडले आहेत. मांजरेकरांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून कोर्टाने पोलीसांना त्यांच्या विरोधात चौकशीचे ही आदेश दिले आहेत. एका अपघातात आश्रमशाळेच्या संस्थाचालकाच्या विरोधात केलेले वक्तव्य महेश मांजरेकरांना भोवण्याची शक्यता आहे.

Mahesh Manjarekar
Hindustani Bhau: पाकिस्तानी चित्रपटावर हिंदुस्थानी भाऊ भडकला, म्हणाला...

पुणे- सोलापूर महामार्गावर महेश मांजरेकरांच्या गाडीचा दुसऱ्या गाडीसोबत अपघात झाला होता. तेव्हा आश्रमशाळेच्या संस्था चालकाविरोधात बदनामी केल्याचा आरोप महेश मांजरेकरांवर करण्यात आला होता. मांजरेकरांविरोधात टेभुर्णी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याप्रमाणे पंढरपूरच्या माढा न्यायालयाने टेभुर्णी पोलिसांना त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Mahesh Manjarekar
Ranveer Singh: एनर्जेटीक रणवीरची हळवी बाजू... व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल रिअल हीरो

टेभुर्णीतील संत रोहिदास आश्रमशाळेचे संस्थापक कैलास सातपुते आणि महेश मांजरेकर या दोघांच्याही वाहनांचा पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावाजवळ अपघात झाला होता. गेल्या वर्षी 2021 मध्ये हा अपघात झाला होता. त्यावेळी मांजरेकरांनी कैलास सातपुतेंची बदमानी करणारे वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सातपुते यांनी मांजरेकर यांच्याविरुध्द टेभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.

Mahesh Manjarekar
Moving In With Malaika: बाथरुम सिक्रेटवर मलायकाला करणनं विचारला विचित्र प्रश्न, लाजून झाली चूर

मांजरेकर यांनी सातपुतेंबद्दल बदनामीकारक वक्तव्य करून प्रतिमा मलिन केल्याची तक्रार माढा कोर्टात देण्यात आली आहे. फिर्यादीची दखल घेत न्यायाधीश गांधी यांनी टेंभुर्णी पोलिसांना मांजरेकर यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत. मांजरेकर यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एका चित्रपटामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या वर्षी 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' या चित्रपटावरुन त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

Mahesh Manjarekar
Urfi Javed New Video : उर्फीला झालंय काय? 'कसला' व्हिडिओ केलाय शेअर, बघून डोकंच फिरेल...

या चित्रपटात त्यांनी लहान मुलांचे काही आक्षेपार्ह चित्रण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी मांजरेकरांविरोधात कलम २९२ ३४, पोक्सो कलम १४ आणि आयटी कलम ६७ आणि ६७ बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com