'Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan' trailer released Saam TV
मनोरंजन बातम्या

रिलीजआधीच भाईजानचा नादखुळा..! 'Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan'च्या ट्रेलरला काही तासात मिळाले 8 मिलियन व्ह्यूज

'Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan' Trailer: अवघ्या १5 तासात 'किसी का भाई किसी कि जान'च्या ट्रेलरला मिलियन व्ह्यूज.

Pooja Dange

'Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan' Trailer released: सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट 'किसी का भाई किसी कि जान' ट्रेलर काल प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला दाक्षिणात्य संस्कृतीची झलक पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील गाण्यांनी तर धुमाकूळ घातला होता. नुकताच प्रकाशित झालेला ट्रेलर देखील गाजतोय.

'किसी का भाई किसी कि जान'च्या ट्रेलरची सुरुवात श्लोकाने होत आहे. त्यानंतर पूजा हेगडे आणि सलमान खान यांची केमिस्ट्री दाखविण्यात आली आहे. त्यानंतर संपूर्ण ट्रेलरमध्ये तुम्हाला अॅक्शन आणि फॅमिली ड्रामा दिसेल. चित्रपटाचा ट्रेलर तुम्हाला नक्कीच आवडेल. कारण यात सलमान खान लव्हर, हिरो, फॅमिलीमॅन अशा सगळ्या भूमिकेत दिसत आहे.

सलमान खानच्या 'किसी का भाई किसी कि जान'चा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. अवघ्या १5 तासात 'किसी का भाई किसी कि जान'च्या ट्रेलर 8 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. सलमानच्या चाहत्यांना तसेच चित्रपटप्रेमींना हा चित्रपट खूप आवडला आहे. या चित्रपटाला मिळालेले व्ह्यूज पाहता चित्रपट बॉक्स ऑफिस कमाल करणार यात शंकाच नाही.

सलमान हा चित्रपट ईदला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये सलमानसह व्यंकटेश डग्गुबती आहे. पूजा हेगडे, शेहनाज गिल, पलक तिवारीसह बॉक्सर विजेंद्र सिंग, डान्सर राघव देखील आहेत.

सलमान खानच्या या चित्रपटातील गाण्यांवर क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी टीका केली आहे. 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटातील 'येंटम्मा' गाण्यावर लक्ष्मण यांनी निशाणा साधला आहे. लक्ष्मण यांनी तो व्हिडिओ रीट्विट करत लिहिले आहे, "हे अत्यंत अयोग्य आणि आपल्या दक्षिण भारतीय संस्कृतीचा अनादर करणारे आहे. ही लुंगी नाही, धोतर आहे. शास्त्रीय वस्त्र घृणास्पद पद्धतीने दाखवले जात आहे".

नुकताच सलमान खानला जीवे मारण्याचा धमकीचा फोन आला होता. हा फोन मूळच्या राजस्थानातील १६ वर्षीय मुलाने केला होता. त्याला शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याआधी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला संपविण्याची धमकी दिली होती. काळवीट मारल्याप्रकरणी सलमानने बिश्नोई समाजाची माफी मागितल्यानंतरच हे प्रकरण संपेल, असे देखील लॉरेन्स बिश्नोईने म्हटले होते. सलमानला जीवे मारणे हे त्याचे ध्येय असल्याचे सुद्धा त्याने सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makar Sankranti 2026: तब्बल १९ वर्षांनंतर होणार चमत्कार; 'या' ३ राशींचं नशीब संक्रांतीला उजळणार

अंबरनाथमध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी खेळी; अजित पवारांच्या नेत्याची उपनगराध्यक्षपदी निवड

Maharashtra Live News Update : लातूरमध्ये भाजपा उमेदवाराच्या नातेवाईकडून पैसे वाटल्याचा प्रकार

Makeup Tips: ब्लश, ब्रॉन्झर आणि हायलाइटरमध्ये नेमका फरक काय?

Solapur Politics: मोठी बातमी! सोलापुरात भाजपकडून अजित पवारांना धक्का, मतदानाआधीच राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार फोडला

SCROLL FOR NEXT