Aamir Khan And Kiran Rao Divorce Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aamir Khan And Kiran Rao Divorce : आमिर- किरण लग्नापूर्वी होते लिव्ह-इन रिलेशनमध्ये; कोणाच्या दबावामुळे केलं लग्न ?

Aamir Khan And Kiran Rao Divorce : लग्नाआधी आमिर आणि किरण वर्षभर लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत होते, असा खुलासा तिने स्वत: मुलाखतीत केला आहे.

Chetan Bodke

अभिनेता आमिर खान आणि दिग्दर्शिका किरण राव यांचा तीन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. आमिर आणि किरण घटस्फोटानंतरही अनेकदा एकत्र स्पॉट झालेले आहेत. घटस्फोटानंतरही हे दोघेही चांगले मित्र आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी आमिरची लेक आयराचं लग्न झालं. यावेळीही किरण राव लग्नात सहभाग झाली होती. नुकतंच किरणने एक मुलाखत दिली आहे, लग्नाआधी आमिर आणि किरण वर्षभर लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत होते, असा खुलासा तिने स्वत: मुलाखतीत केला आहे.

एका यूट्यूब चॅनलला किरण रावने मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत तिला विवाहसंस्थेवर पुन:र्विचार करणे गरजेचे आहे का? असा प्रश्न विचारला. यावर तिने प्रतिक्रिया दिली की, “आमिर आणि मी लग्नापूर्वी एक वर्षापासून एकत्र राहत होतो. खरंतर आम्ही लग्न आई- वडिलांच्या दबावामुळे केलं. त्यांना वाटत होतं की, आम्ही लग्न करुन एकत्र राहावं. लग्न ही एक उत्तम संस्था आहे. मला वाटते की, लग्नामुळे तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी मिळतात, नवीन कुटुंब मिळतं, नवीन नातेसंबंध मिळतात आणि त्यासोबतच लग्न तुम्हाला सुरक्षिततेची आणि स्थिरतेची भावना देतं.”

लग्नानंतर नात्यात समान जबाबदाऱ्या नसतात. प्रत्येक कामाची जबाबदारी स्त्रीवर टाकली जाते. याबद्दल किरण राव म्हणाली, “स्त्रियांवर अनेक जबाबदाऱ्या असतात. तिला घर चालवायचं असतं, कुटुंबाला एकत्र ठेवायचं असतं. महिलांना या परिस्थितीत स्वतःसाठी कमी वेळ मिळतो. लग्नानंतर महिलांकडून पतीकडील कुटुंबीयांची नाती जपणं अपेक्षित असते. त्यांच्याकडून खूप अपेक्षा ठेवतात. या गोष्टीवर चर्चा व्हायला हवी.” किरण आणि आमिरने २०२१ मध्ये एकमेकांपासून घटस्फोट घेतला. लग्नाच्या १६ वर्षांनंतर यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला होता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

General Knowledge: व्यक्तीच्या शिंकण्याचा वेग किती असतो?

Maharashtra Live News Update: पुण्यात भाजप आमदार, महापालिका आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांचा रिक्षाने एकत्रित प्रवास

Ajit Pawar: महायुती सरकार धारावी पुनर्विकास करूनच दाखवणार- अजित पवार|VIDEO

शाहजहाँने दिल्लीमध्येच का बनवला लाल किल्ला?

Raigad News: दरडग्रस्तांचं पुनर्वसन रखडलं; 44 कुटुंबांचा स्वातंत्र्य दिनी आत्मदहनाचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT