Kiran Mane Cast Religion Discrimination Democracy Post Instagram
मनोरंजन बातम्या

Kiran Mane Post: ‘मला माझ्या भवताली जातीभेदाने अन् धर्मद्वेषाने...’ किरण मानेची लोकशाही संबंधित पोस्ट चर्चेत...

Kiran Mane: अशातच किरण मानेने समाजातील विषमतेवर सडेतोड भाष्य केले आहे. नेमकी लोकशाही म्हणजे काय? असा संतप्त सवाल त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला आहे.

Chetan Bodke

Kiran Mane Cast Religion Discrimination Democracy Post: बिग बॉस मराठी फेम किरण माने नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. नाटक, मालिका आणि चित्रपटातून आपली ओळख निर्माण करून त्याने आपली प्रतिमा चाहत्यांमध्ये निर्माण केली आहे. नेहमीच समाजातील घडत असलेल्या कोणत्याही विषयावर असो किंवा मनोरंजन विश्वातील अनेक घडामोडींवर त्याची प्रतिक्रिया येते. अशातच किरण मानेने समाजातील विषमतेवर सडेतोड भाष्य केले आहे. नेमकी लोकशाही म्हणजे काय? असा संतप्त सवाल त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला आहे.

सोशल मीडियावर किरण माने नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो नेहमीच विविध पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करतो. नुकताच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. किरण माने इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हणतो, “मला माझ्या भवताली जातीभेदाने, धर्मद्वेषाने बरबटलेला समाज हवा आहे का???”

“ताकदवान लोक दीनदुबळ्यांना तुडवतायत... सो काॅल्ड 'उच्च' माणसं इतरांना नीच समजून बडवतायत... भर रस्त्यात तलवारींनी वार करून फाडून टाकतायत... पुरूषी वर्चस्वाचा माज हतबल महिलांची फरपट करतोय...” (Latest Entertainment News)

“क्रूर, रानटी जनावरांगत विष ओकत फिरणार्‍यांना कुणाचीच भिती नाही. मनात करूणा, दयाभाव आणि हातात मानवतेचा दिवा असणार्‍यांना सुरक्षितता नाही. माझ्या मनातला ‘आदर्श समाज’ असा आहे का? मला भवताली स्वातंत्र्य, समता, बंधुता हवी असेल, तर कुणाला राग येण्यासारखं त्यात काय आहे?? कुणाचं वाईट होणार आहे यातून? आपसात ‘बंधुत्व’ असावं अशी अपेक्षा ठेवली तर त्यात गैर काय आहे???” (Actor)

आपल्या पोस्टमध्ये किरण माने पुढे म्हणतो, “ ‘लोकशाही’ म्हणजे फक्त शासन पद्धती नाही माझ्या भावाबहिणींनो... ती ‘सहजीवन’ पद्धती आहे! आपण कुठल्याही जातीधर्माचे असो... एकमेकांसाठी आदर आणि श्रद्धा असली तर काय बिघडणार आहे आपलं? आपल्या सगळ्यांना आपल्या या महान भारतदेशात मोकळेपणानं वावरण्याचा अधिकार, आपल्या जीवीत आणि सुरक्षेचा अधिकार हवा की नको?” (Marathi Film)

आपल्या पोस्टमध्ये शेवटी किरण माने म्हणतो, “मी कुणी सर्वज्ञ नाही. मी ही यावर विचार करतोय... आपण सगळेच जमल्यास चिंतन करूया... आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आपला देश, आपला भवताल पूर्वीपेक्षा अधिक सुंदर, अधिक सुरक्षित, हवाहवासा असावा हे तर सगळ्यांचा वाटत असेल. त्यासाठी खारीचा वाटा म्हणून आपल्याला आपल्या स्वत:पुरतं काय करता येईल ते करूया. जय शिवराय, जय भीम !” असं परखड मत मांडत किरण मानेने पोस्ट शेअर केली आहे. (Marathi Theater)

किरण मानेबद्दल बोलायचे तर, नाटकासह, मालिकेत आणि चित्रपटात त्याने काम केले आहे. टेलिव्हिजनवर किरण मानेने ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘मुलगी झाली हो’ सर्वाधिक गाजलेला रिएलिटी शो म्हणजे, ‘बिग बॉस मराठी ४’मधून त्याला सातारचा सलमान नावाने नवी ओळख निर्माण केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘रावरंभा’ चित्रपटात किरण मानेने प्रमुख भूमिका साकारली होती. (Marathi Actors)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ola Electric Scooter: ई-सायकलीच्या किंमतीत मिळणार ओलाची नवीकोरी इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

Thank आणि Thank You यामधील नेमका फरक माहितीये का?

Maharashtra News Live Updates: अंधेरी पश्चिमेतील एका इमारतीला भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Viral Video: हद्दच झाली! बाजारात अश्लील डान्स नंतर नागरिकांनी धु धु धुतले; तरुणाच्या कारनाम्याचा VIDEO व्हायरल

Mumbai Crime : दुसऱ्या पत्नीला आई म्हणण्यास मुलाने दिला नकार, बापाने मुलाचा काटा काढला

SCROLL FOR NEXT