Kim Sae Ron Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kim Sae Ron Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू, राहत्या घरात आढळला मृतदेह

Kim Sae Ron Actress : दक्षिण कोरियन अभिनेत्री किम से-रॉनचा मृत्यू झाला आहे. राहत्या घरात तिचा मृतदेह आढळला. किमच्या मृत्यूमागील कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Yash Shirke

Kim Sae Ron : किम से-रॉन या दक्षिण कोरियन अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे. राहत्या घरामध्ये तिचा मृतदेह आढळल्याची माहिती उघडकीस आली आहे. किम तिच्या मैत्रिणीच्या फोन, मेसेज यांना प्रतिसाद देत नव्हती. तिच्या मैत्रिणीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पुढे आपत्कालीन सेवेतील अधिकारी किमच्या घरी पोहोचले. त्यावेळेस त्यांना किम मृतावस्थेमध्ये आढळली.

किमच्या घरामध्ये जबरदस्तीने प्रवेश केल्याच्या कोणत्याही खुणा आढळल्या नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. किम से-रॉनच्या मृत्यूचे खरे कारण निश्चित करण्यासाठी पोलिसांनी तपास करायला सुरुवात केल्याची माहिती दक्षिण कोरियातील कोरिया हेराल्डने या वृत्तपत्राने दिली आहे. या घटनेमुळे किमचे चाहते शोकाकुल झाले आहेत.

किम से-रॉन या २६ वर्षीय दक्षिण कोरियन अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या घरात आढळला आहे. किमचा जन्म ३१ जुलै २००० रोजी झाला होता. वयाच्या नवव्या वर्षी तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिने 'अ ब्रँड न्यू लाइफ' (२००९) आणि 'द मॅन फ्रॉम नोव्हेअर' (२०१०) या गाजलेल्या कोरियन चित्रपटांमध्ये काम केले होते.

करियरच्या सुरुवातीला मिळालेल्या यशानंतर, किमला वैयक्तिक आणि व्यावसायिक आव्हानांचा सामना करावा लागला. एका हाय प्रोफाईल ड्रंक एन्ड ड्राइव्ह केसमध्ये तिचा समावेश होता. या प्रकरणावरुन तिने जाहीर माफी देखील मागितली होती. त्यानंतर तिला आर्थिक अडचणींदेखील सामोरे जावे लागले होते. 'Bloodhounds' या नेटफ्लिक्सच्या सीरीजमध्ये ती झळकली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramdas Kadam : "पालकमंत्री व्हायचं असेल तर मुंबई-गोवा महामार्ग नीट करा" रामदास कदम यांच भरत गोगावले यांना आवाहन | VIDEO

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

Maharashtra Police : प्रमोशन रखडले, निवृत्ती जवळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची फरफट; जाणून घ्या सविस्तर

BMC Recruitment: खुशखबर! बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; पगार ५०,००० रुपये; आजच अर्ज करा

Shravan Somwar Shivamuth: श्रावणात पहिल्या सोमवारी शंकराला कोणती शिवामूठ वाहावी?

SCROLL FOR NEXT