Manasvi Choudhary
उन्हाळ्याच्या दिवसात अनेकजण नवीन फ्रिज खरेदी करतात. घरात नवीन फ्रिज आणल्यानंतर तो योग्य ठिकाणी ठेवणे महत्वाचे आहे.
वास्तुशास्त्रात , किचनधील फ्रिजच्या जागेविषयी देखील सांगितले आहे. वास्तूशास्त्रानुसार किचनमध्ये फ्रिज हा आग्नेय दिशेला ठेवणे योग्य मानले जाते.
आग्नेय दिशा ही ऊर्जा आणि सकारात्मकतेचे प्रतिक मानली जाते. या दिशेला फ्रिज ठेवल्याने घरात सुख- समृ्द्धी येते.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि तेथे ठेवलेल्या वस्तूमध्ये ऊर्जा असते जी घरामध्ये परिणाम करते.
ईशान्य कोपऱ्यात फ्रीज ठेवू नका, कारण यामुळे प्रगतीत अडथळे येऊ शकतात. घरात नकारात्मक वातावरण राहील.
फ्रीज कधीही भिंतीला चिकटवून ठेवू नका. वास्तूनुसार आणि तांत्रिकदृष्ट्याही हवा खेळती राहण्यासाठी किमान ६ इंचाचे अंतर असावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.