Manasvi Choudhary
हिंदू धर्मात फार पूर्वीपासून लग्न जुळवण्यापूर्वी मुला- मुलींची कुंडली पाहतात. लग्नाची जुळवणी करताना केवळ मुलगा व मुलगी यांचाच विचार केला जात नाही तर त्यांच्या गुणांची जुळवणी केली जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार, भविष्यात उद्भवणारे त्रास, दु:ख, अडथळे टाळण्यासाठी मुलगा व मुलगी यांच्यातील कुंडली जुळवली जाते.
यात दोघांच्याही जन्माची पत्रिका पाहून गुणांची कमाल जुळणी, मंगळ दोष आणि नाडी दोष याची तपासणी केली जाते.
पत्रिका जुळवताना वर्ण, वास्य, नक्षत्र, योनी, ग्रह मैत्री, गण, भकूट आणि नाडी हे 8 गुणधर्म तपासले जातात. यामध्ये प्रत्येक गुणधर्माची एक विशिष्ट संख्या असते.
कुंडलीत एकूण 36 गुण असतात . ज्योतिषशास्त्रानुसार, एकूण 36 गुणांपैकी मुला- मुलींचे 18 ते 21 गुण जुळत असतील तर मध्यम गुणमेलन झाले असे मानले जाते.
मुला- मुलींचे 21 पेक्षा जास्त गुण जुळल्यास त्याला शुभ गुणमिलन म्हणतात. तसेच एखाद्या मुला- मुलींचे 36 पैकी 36 गुण जुळले तर ते सर्वोत्तम चांगले मानले जाते.
लग्नासाठी मुला- मुलींचे 18 गुण जुळणे आवश्यक आहेत. जर एखाद्या मुला व मुलीचे 18 पेक्षा कमी गुण जुळले असतील तर अनेक समस्यांना सामोरे जावू लागते यामुळे वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.