Kiara Advani-Sidharth Malhotra saam tv
मनोरंजन बातम्या

Siddharth- Kiara Wedding: सिद्धार्थ- कियाराच्या लग्नात भटजींना मिळाले 'एवढी'दक्षिणा, खुद्द भटजींनीच केला खुलासा...

सोबतच या जोडीच्या लग्नाबाबत अनेक गोष्टी सध्या बऱ्याच व्हायरल होत आहेत.

Chetan Bodke

Siddharth- Kiara Wedding: सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. 7 फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये या बॉलिवूडच्या क्युट कपलने लग्नगाठ बांधली. या दोघांचेही फोटो सध्या सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. सोबतच या जोडीच्या लग्नाबाबत अनेक गोष्टी सध्या बऱ्याच व्हायरल होत आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे भटजी? त्यांच्या साक्षीने या दोघांनीही लग्नगाठ बांधली, सोबतच भटजींना किती दक्षिणा मिळाली याची ही सध्या चर्चा होत आहे.

सिद्धार्थ- कियाराचे लग्न लावल्यानंतर भटजींनी माध्यमांशी संवाद साधला आणि या जोडप्याबद्दल अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. हा विवाह सनातन धर्मानुसार झाला असून राजस्थानच्या संस्कृतीप्रमाणे यांनी लग्नगाठ बांधल्याचे सांगितले. याशिवाय भटजींनी या जोडप्याचे जोरदार कौतुक देखील केले.

भटजी म्हणतात, कियारा आणि सिद्धार्थ ही खूपच सुंदर जोडी आहे. या दोघांचीही 'मेड फॉर इच अदर' जोडी असून मनमिळाऊ साथीदार एकमेकांना मिळाले आहे. तुम्ही दोघेही सदैव आनंदी राहावे, अशी माझी इच्छा आहे.

जेव्हा त्यांना लग्नाला मिळालेल्या दक्षिणेबद्दल विचारण्यात आले तेव्हा भटजी म्हणाले की, 'कधी लक्षात ठेवा की तुमची जमीन, मालमत्ता आणि उत्पन्न तुमच्या खिशात असते. दक्षिणा ही एक अनुभूती आहे, ती कधीच सांगितली जात नाही.' असे म्हणत त्यांनी माध्यमांना उत्तर दिले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pollution Alarm: पुणेकरांच्या फुफ्फुसात विषारी धूळ; हवेत दर तासाला मिसळलं जातंय 6 टन सिमेंट

EPFO चा ऐतिहासिक निर्णय; आता UPI द्वारे पीएफ काढता येणार?

husband wife clash : पतीचा फोन हिसकवाल तर जेलमध्ये जाल? तक्रार केल्यास 3 वर्षांची शिक्षा, दंडही लागणार?

Maharashtra Politics: काँग्रेस-हिंदुत्ववादी रस्त्यावर भिडले; काँग्रेस प्रवक्त्यावर हल्ला,राजकारणाचा कल्ला

राज्यसभेसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या नावांचा सस्पेन्स संपला? आठवलेंचं नाव निश्चित, भाजपकडून ३ जागांवर कुणाला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT